शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

बलूच बंडखोरांनी मोठ्या बँकेवर कब्जा केला अन् उडवून दिली; १० जिल्ह्यांत रणकंदन, बँका लुटल्या अन् पोलीस ठाणी पेटवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 21:08 IST

बलूचिस्तानमध्ये BLA चा मोठा लष्करी हल्ला. क्वेटात बँक उडवली, पोलीस ठाण्यांवर कब्जा. १० पाकिस्तानी सैनिक ठार. जाणून घ्या काय आहे 'ऑपरेशन हेरॉफ २.०'.

पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात शनिवारी बलोच बंडखोरांनी पुकारलेल्या 'स्वातंत्र्य युद्धा'ने भीषण रूप धारण केले आहे. 'बलोच लिबरेशन आर्मी'ने (BLA) 'ऑपरेशन हेरॉफ २.०' अंतर्गत एकाच वेळी १० हून अधिक जिल्ह्यांमध्ये भीषण हल्ले केले आहेत. या कारवाईने केवळ शाहबाज शरीफ सरकारच नाही, तर रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयात बसलेले लष्करप्रमुख आसिम मुनीर यांचीही झोप उडवली आहे.

या ऑपरेशनमधील सर्वात धक्कादायक घटना क्वेटा शहरात घडली. बलोच बंडखोरांनी येथील 'फैजल बँक'च्या इमारतीवर ताबा मिळवला. बँकेतील लाखो रुपयांची रोकड आणि मौल्यवान साठा लुटल्यानंतर, बंडखोरांनी संपूर्ण इमारत मोर्टार आणि रॉकेटने उडवून दिली. या स्फोटाच्या तीव्रतेने संपूर्ण क्वेटा शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलीस ठाणी आणि लष्करी तळांवर ताबाBLA ने जारी केलेल्या माहितीनुसार, त्यांचे लढाऊ सैन्य आता केवळ हल्ले करत नसून शहरांवर ताबा मिळवत आहेत. नुश्की येथील काउंटर टेररिझम डिपार्टमेंटच्या मुख्यालयावर बंडखोरांनी कब्जा केला आहे. क्वेटा येथील सरियाब न्यू पोलीस स्टेशन आणि इस्टर्न बायपास पोलीस स्टेशनवर ताबा मिळवून पोलिसांची वाहने पेटवून देण्यात आली आहेत. मस्तुंग येथील पोलीस ठाण्यावर कब्जा करून बंडखोरांनी कैद्यांची सुटका केली आहे. ग्वादर आणि पसनी भागातील चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरशी (CPEC) संबंधित महत्त्वाच्या केंद्रांवरही हल्ले झाले आहेत.

हानी आणि दावेया रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत पाकिस्तानचे १० सुरक्षा रक्षक मारले गेल्याची पुष्टी झाली आहे, तर ६० हून अधिक बंडखोरांना ठार केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. बलोच नेते बशीर जेब बलोच यांनी एका व्हिडिओद्वारे या मोहिमेची घोषणा करत, जोपर्यंत पाकिस्तानचा 'कब्जा' हटत नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baloch insurgents seize bank, blow it up; unrest in Balochistan.

Web Summary : Balochistan faces severe unrest as insurgents attack multiple districts. They seized a bank in Quetta, looted it, and destroyed it. Police stations and security forces were also targeted, escalating the conflict.
टॅग्स :Pakistanपाकिस्तान