मिसाईल पडत होती, पाकिस्तानी-बांगलादेशी जल्लोष करत होते; बहरीनमध्ये झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:54 IST2026-03-10T10:53:01+5:302026-03-10T10:54:07+5:30
बहरीनमध्ये इराण समर्थक व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांसह ६ जणांना अटक. मध्य आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बहरीन सरकारचा कडक निर्णय. वाचा सविस्तर.

मिसाईल पडत होती, पाकिस्तानी-बांगलादेशी जल्लोष करत होते; बहरीनमध्ये झाली अटक
मध्य आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहरीन सरकारने देशांतर्गत सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई करत सहा परदेशी नागरिकांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक बहरीनमध्ये नोकरी किंवा व्यवसायानिमित्त राहत होते. या नागरिकांनी इराण-इस्रायल संघर्षादरम्यान इराणच्या लष्करी कारवायांचे समर्थन करणारे आणि बहरीनच्या अधिकृत धोरणांच्या विरोधात जाणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते.
बहरीन सरकारने स्पष्ट केले आहे की, देशाची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही. प्रक्षोभक मजकूर पसरवणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या परदेशी कामगारांमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडिया वापराबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.