शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उपचार केल्यास २२ आठवड्यांचे बाळही जगू शकते

By admin | Updated: May 8, 2015 04:59 IST

: गर्भधारणेचा कालावधी पूर्ण न करता जन्माला येणाऱ्या अपुऱ्या दिवसाच्या मुलामधील अगदी लवकर जन्मलेली म्हणजेच २२ आठवडे वय

वॉशिंग्टन : गर्भधारणेचा कालावधी पूर्ण न करता जन्माला येणाऱ्या अपुऱ्या दिवसाच्या मुलामधील अगदी लवकर जन्मलेली म्हणजेच २२ आठवडे वय असणारी मुलेही अतिदक्षता कक्षात योग्य ते उपचार मिळाल्यास जगू शकतात असा नव्या संशोधनाचा निष्कर्ष असून यामुळे गर्भपाताच्या नियमाबद्दल वाद निर्माण झाला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाले असून, बालरोगशास्त्रासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे; पण त्याचबरोबर पालक, डॉक्टर आणि संसद सदस्य यांच्यासाठीही ते फार महत्त्वाचे ठरणार आहे, कारण गर्भाची टिकण्याची क्षमता असणारे वय लक्षात घेऊन गर्भपाताचा नियम ठरविण्यात आला आहे. त्या नियमाला धक्का बसणारे हे संशोधन आहे. गर्भधारणेचा पूर्ण कालावधी ४० आठवड्यांचा असतो आणि बहुतांश मुले तो पूर्ण झाल्यानंतरच जन्माला येतात. २४ आठवड्यांआधीचे मूल जगू शकत नाही असे मानले जाते. या संशोधकांनी २७ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या ५ हजार बाळांचा अभ्यास केला.लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमधील नवजात अर्भक तज्ज्ञ नील मार्लो यांच्या म्हणण्यानुसार २२ आठवड्यांचे मूल जगण्याची शक्यता फारच कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्याची काळजी घेतली जात नसे; पण नव्या संशोधनानुसार अशी बाळे न जगण्याचे मुख्य कारण डॉक्टर हे असून, डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे कष्ट न घेतल्यामुळे अशी मुले मृत्यूच्या दारात लोटली जातात. आयोवा विद्यापीठातील बालरोगचिकित्सक व या संशोधनाचे सहसंशोधक एडवर्ड बेल यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार २२ आठवडे हा मूल जगण्याचा कालावधी मानला जावा. या वयातील मूल गर्भाशयाबाहेर उपचार दिल्यास जगू शकते.