"मला शहीद व्हायचंय"; चिमुकल्याच्या इच्छेवर खामेनींनी दिलेलं असं उत्तर; जुना व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 19:07 IST2026-03-01T18:59:58+5:302026-03-01T19:07:37+5:30

अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इरानचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला.

Ayatollah Khamenei Resurfaced Video Shows His Surprising Advice to a Young Boy | "मला शहीद व्हायचंय"; चिमुकल्याच्या इच्छेवर खामेनींनी दिलेलं असं उत्तर; जुना व्हिडिओ व्हायरल

"मला शहीद व्हायचंय"; चिमुकल्याच्या इच्छेवर खामेनींनी दिलेलं असं उत्तर; जुना व्हिडिओ व्हायरल

Ayatollah Khamenei: अमेरिका आणि इस्रायलनेइराणची राजधानी तेहरानवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू झाला आहे. इराणी सरकारी प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि जगभरातील मुस्लिम राष्ट्रामध्ये खळबळ उडाली. शनिवारी खामेनी यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या कमांडरसह अनेक उच्चपदस्थ अधिकारीही मारले गेले. आता खामेनींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेतन्याहू यांना दाखवण्यात आला मृतदेहाचा फोटो

इस्रायली माध्यमांनुसार, तेहरानमधील उद्ध्वस्त ढिगाऱ्याखालून खामेनी यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर, त्याचा फोटो इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना दाखवण्यात आला. खामेनी यांनी १९८९ पासून २०२६ पर्यंत इराणचे सर्वोच्च नेते म्हणून सत्ता गाजवली होती. त्यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर जुना व्हिडिओ चर्चेत

खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा खामेनी यांना भेटून आपण शहीद होण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यावर खामेनी त्याला उत्तर देताना म्हणतात की, "सध्या तुझे वय अभ्यासाचे आहे. आधी नीट शिक्षण घे, विज्ञान शिक आणि एक चांगला वैज्ञानिक बनून इस्लामची सेवा कर. आयुष्य पूर्ण जग आणि जेव्हा तू म्हातारा होशील, तेव्हा शहीद होण्याचा विचार कर."

या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला मुलांसाठी दिलेला योग्य सल्ला मानत आहेत. दुसरीकडे, अनेक युजर्सच्या मते लहान वयातच मुलांच्या मनात विशिष्ट विचारधारेचे रुजवली जात आहे. काहींनी दावा केला की, मुलाला वैज्ञानिक बनण्याचा सल्ला देणे हा इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमाकडे केलेला एक अप्रत्यक्ष इशारा होता.

इराणमध्ये अनिश्चिततेचे वातावरण

खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सूड घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, इराणचा कारभार चालवण्यासाठी सध्या एक अंतरिम नेतृत्व परिषद स्थापन करण्यात आली असून, यामध्ये ज्येष्ठ धर्मगुरू अलीरेझा अराफी यांचा समावेश आहे. कायमस्वरूपी वारसदार मिळेपर्यंत ही परिषद देशाचे कामकाज पाहणार आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेला ऐतिहासिक वळण म्हटले असून इराणी जनतेला आपला देश परत मिळवण्याचे आवाहन केले आहे. तेहरानमध्ये हजारो लोक शोक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले असतानाच, इराणबाहेर आणि देशातील काही गटांमध्ये या घटनेनंतर आनंद व्यक्त केला जात आहे.

Web Title : "मैं शहीद होना चाहता हूँ": खामेनेई का जवाब; पुराना वीडियो वायरल

Web Summary : अयातुल्ला खामेनेई की कथित इजरायली-अमेरिकी हमले में मौत की खबरों के बाद, एक पुराना वीडियो सामने आया। इसमें खामेनेई एक शहीद बनने की इच्छा रखने वाले लड़के को विज्ञान का अध्ययन करने और बाद में जीवन में इस्लाम की सेवा करने की सलाह दे रहे हैं। ईरान ने शोक की अवधि घोषित की है।

Web Title : "I Want to be a Martyr": Khamenei's Reply; Old Video Viral

Web Summary : Following reports of Ayatollah Khamenei's death in an alleged Israeli-US attack, an old video surfaced. It shows Khamenei advising a young boy wanting to be a martyr to study science and serve Islam later in life. Iran has declared a period of mourning.