Ayatollah Ali Khamenei: इराणमधील 'या' पवित्र शहरात होणार अयातुल्लाह अली खामेनेई यांचा अंत्यविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:29 IST2026-03-04T15:27:00+5:302026-03-04T15:29:00+5:30

Ayatollah Ali Khamenei Funeral: अमेरिका-इस्रायलने संयुक्त मोहीम राबवत अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या केली. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही घटना घडली. आता त्यांचे पार्थिव दफन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Ayatollah Ali Khamenei: Ayatollah Ali Khamenei's funeral will be held in 'this' holy city in Iran | Ayatollah Ali Khamenei: इराणमधील 'या' पवित्र शहरात होणार अयातुल्लाह अली खामेनेई यांचा अंत्यविधी

Ayatollah Ali Khamenei: इराणमधील 'या' पवित्र शहरात होणार अयातुल्लाह अली खामेनेई यांचा अंत्यविधी

Ayatollah Ali Khamenei News: इस्रायल-अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर युद्धाची ठिणगी पडली. या युद्धाच्या सुरुवातीलाच अयातुल्लाह अली खामेनेई यांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असून, इराणमध्ये सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या शहरात त्यांचा दफनविधी होणार आहे. इराणची विश्वसनीय वृत्तसंस्था फार्स न्यूजच्या हवाल्याने एएफपीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मशहद शहरात यांचा दफनविधी होणार आहे. याच शहरात खामेनेई यांचा जन्म झाला होता. याच ठिकाणी खामेनेई यांचे वडील इमाम रजा दरगाह यांना दफन करण्यात आलेले आहे. 

३६ वर्ष इराणचे सर्वोच्च नेते म्हणून अयातुल्लाह अली खामेनेई हे कार्यरत होते. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने त्यांची एक मोहीम आखून हत्या केली. ते ८६ वर्षांचे होते. खामेनेई यांच्या मृत्यूची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली, तर नंतर इराण सरकारने त्याला दुजोरा दिला. 

खामेनेई यांना सुपुर्द ए खाक करण्यापूर्वी इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने असे म्हटले आहे की, तेहरानमध्ये एक मोठी निरोप समारंभ होणार आहे.  

अयातुल्लाह अली खामेनेई यांचा दफनविधी कधी?

तेहरान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, इराणच्या स्थानिक वेळेप्रमाणे रात्री १० वाजता खामेनेई यांच्या अंतिम संस्काराचा विधी सुरू होणार आहे. इमाम खुमैनी मशि‍दीमध्ये ३ दिवस त्यांचा अंतिम निरोपाचा कार्यक्रम होणार आहे. सुपुर्द ए खाक विधी आता सुरू झाला आहे. 

इराणमध्ये मशहद का मानले जाते पवित्र? 

इराणमधील सर्वात मोठ्या शहरांमध्ये दुसऱ्या स्थानावर मशहद आहे. ते देशातील एक धार्मिक केंद्र आहे. इथे इमाम रजा यांचा दरगाह आहे, जे शिया पंथीयासाठी मोठे पवित्र तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते. इथे दरवर्षी लाखो लोक येतात. 

खामेनेई हे इराणचे सर्वात जास्त काळ सर्वोच्च नेते राहिले होते. १९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर खामेनेई हे दुसरे सर्वोच्च नेते होते. देशातील सर्वोच्च नेता म्हणून त्यांच्याकडे संरक्षण, अर्थव्यवस्था आणि शिक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार होते. 

तीन दशके इराणचे सर्वोच्च नेते म्हणून काम करत असताना त्यांनी इराणच्या राजकारणावरील आपली पकड कायम ठेवली होती. त्याचबरोबर मध्य पूर्वेतही आपला दबदबा वाढवला होता. 

Web Title : अयातुल्ला अली खामेनेई का अंतिम संस्कार मशहद में होगा

Web Summary : अयातुल्ला अली खामेनेई का कथित तौर पर इजरायली-अमेरिकी हमले में निधन हो गया। उनका अंतिम संस्कार ईरान के पवित्र शहर मशहद में होगा, जहाँ उनका जन्म हुआ और उनके पिता दफन हैं। दफनाने से पहले तेहरान में विदाई समारोह होगा।

Web Title : Ayatollah Ali Khamenei's Funeral to be Held in Mashhad

Web Summary : Ayatollah Ali Khamenei died following an alleged Israeli-American attack. His funeral will be held in Mashhad, Iran's holy city, where he was born and his father is buried. A farewell ceremony will occur in Tehran before burial.