अमेरिका-इस्रायल VS इराण युद्धात आता ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा, स्पष्ट केला 'इरादा'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:08 IST2026-03-02T16:08:09+5:302026-03-02T16:08:35+5:30
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी आखाती देशांना इराण किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून प्रत्युत्तराची शक्यता निर्माण होऊ शकेल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिका-इस्रायल VS इराण युद्धात आता ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा, स्पष्ट केला 'इरादा'!
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध आता अधिकच तीव्र झाले आहे. इराणने आज पुन्हा एकदा मध्यपूर्वेतील सौदी आदी देशांवर जबरदस्त हल्ला चढवला असून संपूर्ण मध्यपूर्वेत दहशतीचे वातावरण निर्माम झाले आहे. या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने मोठी घोषणा केली आहे. इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी मोहिमेत आपण सहभागी होणार नाहीत आणि तणाव वाढल्यास मध्यपूर्वेत आपले सैन्यही तैनात करणार नाहीत, असे ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
मध्येपूर्वेत हाहाकार, इराणने अमेरिकन ठिकानांना केलं लक्ष्य -
इस्रायलने तेहरानवर केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर इराणने क्षेपणास्त्रांचा अक्षरशः वर्षाव सुरू केला. इराणने आज कुवैत, बहरीन, दुबई आणि सौदी अरबमध्ये भीषण हल्ले केले. कुवैतमधील अमेरिकन दूतावासावर थेट हल्ला झाल्याने तेथे धुराचे लोट दिसत आहेत. तसेच, बहरीनमधील अमेरिकन 'फिफ्थ फ्लीट'च्या मुख्यालयालाही इराणने लक्ष्य केले आहे. इराकच्या इरबिलमध्येही जोरदार स्फोट झाले असून सर्वत्र हाहाकार माजला आहे.
सौदीची भूमिका सावध-
इराणच्या या हल्ल्यांनंतर सौदी अरेबियाने सावध भूमिका घेतली आहे. सौदीने इराणवर कोणतीही प्रत्युत्कारी कारवाई न करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, इतर खाडी देशांनाही अशा प्रत्युत्तरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी आखाती देशांना इराण किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून प्रत्युत्तराची शक्यता निर्माण होऊ शकेल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन केले आहे.
"शस्त्रे टाका अन्यथा..." -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लष्करी अधिकार्यांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य होत नाहीत, तोपर्यंत इराणविरुद्धची लष्करी मोहीम थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी व्हिडिओ संबोधनात म्हटले आहे की, "इराणी सैनिकांनी शस्त्रे टाकावीत, अन्यथा त्यांना निश्चितपणे मृत्यूला सामोरे जावे लागेल. हे परिणाम अत्यंत भयावह असतील." यावेली त्यांनी, शरण येणाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देण्याचे आश्वासनही दिले.
चर्चेचा मार्गही खुला -
एका मुलाखतीत, इराणसोबत चर्चा होऊ शकते? असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, "माहीत नाही, इराणला चर्चा करायची आहे, पण मी त्यांना सांगितले की, चर्चा गेल्या आठवड्यात करायची होती. या आठवड्यात नाही." दरम्यान, ट्रम्प यांनी बहरीन, सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि जॉर्डनच्या नेत्यांशी संवाद साधला असून, लवकरच ते अमेरिकन जनतेला संबोधित करणार आहेत.