भारतीय वंशाच्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले, मानेवर गुडघा दाबल्याने कोमात गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:33 IST2025-06-03T18:32:21+5:302025-06-03T18:33:26+5:30

Australia: या घटनेनंतर स्थानिकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र संताप आहे.

Australia: Indian-origin man arrested by police, falls into coma after knee presses on neck | भारतीय वंशाच्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले, मानेवर गुडघा दाबल्याने कोमात गेला

भारतीय वंशाच्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले, मानेवर गुडघा दाबल्याने कोमात गेला

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियातील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक करताना पोलिसांनी त्याच्या मानेवर गुडघा ठेवला, त्यामुळे तो कोमात गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्या व्यक्तीच्या मेंदूला गंभीर गंभीर दुखापत झाली आहे. 

ऑस्ट्रेलियन पोलिसांवर आरोप
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी जाणूनबुजून भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा आरोप आहे. ही घटना अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येची आठवण करून देते. ज्यामुळे जगभरात संताप व्यक्त झाला होता.

कोमात गेलेला भारतीय कोण आहे?
ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे कोमात गेलेला भारतीय वंशाचा व्यक्तीचे नाव गौरव कुंडी(42 वर्षे) आहे. पोलिसांनी त्याला अॅडलेडच्या पूर्व उपनगरात अटक करताना जमिनीवर फेकले. स्थानिक माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, गौरव आणि त्याची मैत्रीण अमृतपाल कौर मोठ्याने निर्दोष असल्याचे सांगताना दिसत आहेत. 

गौरवला कोणत्या प्रकरणात अटक ?
ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, गौरव जमिनीवर फेकल्यानंतर बेशुद्ध झाला. त्याच्या मैत्रिणीने आरोप केला की, एका पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर गुडघा ठेवला होता. अगदी 2020 मध्ये अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइडसोबत घडलेल्या घटनेप्रमाणे. यामुळे गौरव कोमात गेला असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर स्थानिक समुदायात न्याय आणि पोलिस कारवाईची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांनी गौरवला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली हे सांगितलेले नाही.
 

Web Title: Australia: Indian-origin man arrested by police, falls into coma after knee presses on neck