या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 00:04 IST2025-10-08T23:59:24+5:302025-10-09T00:04:29+5:30
Attack On President Of Ecuador: दक्षिण अमेरिकेतील एक देश असलेल्या इक्वाडोर येथे राष्ट्रपती डॅनियल नोबोआय यांच्यावर कैनार परिसरात जीवघेणा हल्ला झाला. संतप्त जमावाने त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या कारला घेराव घालण्याचा प्रयत्न करून हल्ला केला गेला.

या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
दक्षिण अमेरिकेतील एक देश असलेल्या इक्वाडोर येथे राष्ट्रपती डॅनियल नोबोआय यांच्यावर कैनार परिसरात जीवघेणा हल्ला झाला. संतप्त जमावाने त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या कारला घेराव घालण्याचा प्रयत्न करून हल्ला केला गेला. यादरम्यान, कारवर गोळीबार करण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. ,सुदैवाने या हल्ल्यात राष्ट्रपतींना कुठलीही दुखापत झालेली नाही.
इक्वाडोर सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, राष्ट्रपतींना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच त्यांच्या कारवार गोळीबाराच्या खुणा आहेत. देशाचे पर्यावरण आणि ऊर्जामंत्री इनेस मेनजेनो यांनी राष्ट्रपतींच्या हत्येच्या प्रयत्नाबाबत अधिकृत तक्रार नोंदवली आहे. सुमारे ५०० जणांच्या जमावाने नोबोआ यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. आता या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ऊर्जामंत्री मेनजेनो यांनी सांगितले की, राष्ट्रपतींच्या कारवर दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे गुन्हेगारी कृत्य आहे आम्ही असं होऊ देणार नाही. दर राष्ट्रपती नोबोआ यांच्या कार्यालयाने सांगितले की, ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर दहशतवाद आणि हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनादरम्यान, राष्ट्रपतींच्या कारवर गोळीबार झाला होता का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.