शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोराने ‘तो’ सेल्फी व्हॉटस् अ‍ॅपने पाठविला

By admin | Updated: June 29, 2015 11:59 IST

फ्रान्समधील एका गॅस कारखान्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे धडापासून मुंडके अलग केलेल्या शवासोबत ‘सेल्फी’ काढून क्रूरतेचा कळस गाठला.

पॅरिस : फ्रान्समधील एका गॅस कारखान्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे धडापासून मुंडके अलग केलेल्या शवासोबत ‘सेल्फी’ काढून क्रूरतेचा कळस गाठला. या अमानवी हत्येबद्दल खुद आरोपीनेच सेल्फी कबुली दिली आहे.तपासाशी संबंधित सुत्रांनी सांगितले की, यासिन सालही (३५) याने हत्येशी संबंधित ‘परिस्थितीबाबतही माहिती’ दिली आहे. आरोपीला चौकशीसाठी पॅरिस येथे दहशतवादविरोधी पोलिसांकडे पाठविण्यात आले आहे.सुरक्षा विभागाच्या सूत्रांनुसार या हल्ल्यामागचा संशयित यासीन सल्ही याने व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून हा भयानक ‘सेल्फी’ कॅनडीतील मोबाईल फोननंबरवर पाठविल्याचे उघडकीस आले आहे. हा क्रूर ‘सेल्फी’ कोणाला पाठविण्यात आला, हा मोबाईल कोणाचा, याचा कसून तपास केला जात आहे. अशावेळी सालहीचा कबुलीनामा आला आहे. अनेक तासांच्या मौनानंतर सालहीने हल्ल्याबाबत तपासकर्त्यांना माहिती देण्यास सुरूवात केली आहे.दरम्यान, शुक्रवारी या संशयिताने या कारखान्यातील ज्वलनशील द्रवपदार्थाच्या गोदामावर ट्रक घुसवत भीषण स्फोट घडवून आणला. तसेच हेर्वे कॉर्नरा यांचा शिरच्छेद करून कारखान्याच्या मुख्य दरवाजावर कार्नरा यांचे मुंडके लटकावले होते. तसेच इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा झेंडाही सोबत फडकत होता. कार्नरा त्याचे साहेब होते. (वृत्तसंस्था)कुवेतमधील आत्मघाती हल्लेखोर सौदी नागरिक> कुवेत सिटी : शुक्रवारी येथील मशिदीवर आत्मघाती हल्ला करणारा सौदी नागरिक असल्याचे उघड झाले असून त्याचे खरे नाव फहद सुलेमान अब्दुलमोहसीन अल-काबा असे असल्याचे वृत्त कुवेतच्या गृहमंत्रालयाच्या हवाल्याने देण्यात आले आहे.> या भीषण हल्ल्यात २६ जण ठार, तर २२७ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेशी संलग्नित सौदीतील संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या आत्मघाती हल्लेखोराची ओळख अबू सुलेमान अल-मुवाहीद असे सांगण्यात येते. > तथापि, याचे खरे नाव फहद सुलेमान अब्दुलमोहसीन अल-काबा असे असल्याचे कुवेती वृत्तसंस्थेने म्हटले आहे. फहद हा शुक्रवारी पहाटेच कुवेतमध्ये दाखल झाला होता. विमानतळावरून मशिदीपर्यंत त्याला घेऊन येणाऱ्या कार चालकाला सुरक्षा विभागाने अटक केली असून त्याचे नाव अब्दुल रहमान सबाह इदन आहे.