वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:42 IST2025-11-27T14:37:50+5:302025-11-27T14:42:23+5:30
इथिओपियाच्या उत्तर-पूर्वेकडील हेयली गुबी ज्वालामुखी १२,००० वर्षांच्या दीर्घकाळानंतर, रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी अचानक सक्रिय झाला आणि त्यातून राख व धुराचे मोठे ढग बाहेर पडले.

वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
२३ नोव्हेंबरला हेयली गुब्बी हा ज्वालामुखी अचानक सक्रिय झाला आणि जगभरात खळबळ उडाली. बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ती 'बाबा वेंगा' हिने अनेक वर्षांपूर्वी केलेल्या २०२५ मधील एका भविष्यवाणीची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
इथिओपियाच्या उत्तर-पूर्वेकडील हेयली गुबी ज्वालामुखी १२,००० वर्षांच्या दीर्घकाळानंतर, रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी अचानक सक्रिय झाला आणि त्यातून राख व धुराचे मोठे ढग बाहेर पडले. या घटनेने संपूर्ण जगाला धक्का बसला असून, वैज्ञानिकांनी याला इतिहासातील सर्वात 'असाधारण घटनां'पैकी एक म्हटले आहे. ही राख पार अगदी हजारो किमी भारतापर्यंत येऊन पोहोचली आहे. ती कधी जमिनीवर बसेल हे कोणालाच माहिती नाही, परंतू यामुळे विमानोड्डाणे प्रभावित झाली असून हवेतील प्रदुषणात देखील वाढ झाली आहे.
या नैसर्गिक आपत्तीनंतर अनेक लोकांनी या घटनेला 'बाबा वेंगा'च्या २०२५ च्या भविष्यवाण्यांशी जोडण्यास सुरुवात केली आहे. बाबा वेंगाने २०२५ साठी केलेल्या काही अस्पष्ट भविष्यवाण्यांमध्ये 'जगात अनेक ज्वालामुखी उद्रेक' होतील, असा दावा करण्यात आला होता. १२ हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक होणे, हा केवळ योगायोग नसून ती बाबा वेंगाची भविष्यवाणीच खरी ठरली आहे, असे सोशल मीडियावर हजारो लोक मानत आहेत.
असे असले तरी वैज्ञानिक आणि अनेक विश्लेषक या मताशी सहमत नाहीत. ते सांगतात की, जगात दरवर्षी साधारण ५० ते ७० ज्वालामुखी सक्रिय होत असतात. त्यामुळे कोणत्याही भविष्यवेत्त्यांनी ज्वालामुखी उद्रेकाची भविष्यवाणी करणे, हे सहज शक्य आहे. या भविष्यवाणीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही.
यापूर्वी बाबा वेंगाने १९८६ मधील चेर्नोबिल अणु दुर्घटना आणि ९/११ चा दहशतवादी हल्ला यांसारख्या मोठ्या घटनांची अचूक भविष्यवाणी केली असल्याचे मानले जाते, ज्यामुळे तिच्या नवीन भविष्यवाण्यांना विशेष महत्त्व दिले जात आहे.