शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

भूतानशी सीमावादामागे चीनचे लक्ष्य अरुणाचल प्रदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 4:28 AM

पूर्व भागात हा दावा करण्यामागे चीनची योजनाबद्ध पावले असून, भारतावर भूतानच्या माध्यमातून हा त्याचा नवा राजनैतिक हल्ला आहे.

बीजिंग : भारताला लक्ष्य करण्यासाठी भारताचा मित्र भूतानशी आमचा सीमावाद आहे, असे चीन सरकारने प्रथमच जाहीरपणे सांगितले आहे. पूर्व भागात हा दावा करण्यामागे चीनची योजनाबद्ध पावले असून, भारतावर भूतानच्या माध्यमातून हा त्याचा नवा राजनैतिक हल्ला आहे.भूतानच्या पूर्वेकडील भाग हा अरुणाचल प्रदेशला लागून असल्यामुळे त्याने हा दावा केला असू शकतो. अरुणाचल प्रदेश हा पूर्णपणे आमचा म्हणजे ‘दक्षिण तिबेट’चा भाग असल्याचा त्याचा दावा आहे. भूतानशी सीमावाद असल्याचे त्याने प्रथमच बोलण्यामागील हेतू हा असू शकतो. जून महिन्यात झालेल्या अनेकस्तरीय पर्यावरण व्यासपीठावर पहिल्यांदा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, पूर्व भागात आमचा भूतानशी सीमावाद आहे. यावेळी भारतही उपस्थित होता.पूर्व भागातील घडामोडींवर लक्ष असलेल्या अनेकांना या दाव्याचे आश्चर्य वाटले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, चीन-भूतान सीमा कधीही निश्चित करण्यात आलेली नाही आणि पूर्व, मध्य आणि पश्चिम विभागांतप्रदीर्घ काळपासून वाद आहेच. चीन-भूतान सीमा वादात तिसऱ्या देशाने लक्ष घालू नये, असेही त्यात म्हटले होते. हा तिसरा देश म्हणजे भारत असल्याचे त्यात अप्रत्यक्षपणे म्हटले होते.सकतेंग अभयारण्यावर चीनचा दावा कायमसकतेंग वन्यजीव अभयारण्यावर चीनने दावा सांगितल्यानंतर काळजीत पडलेल्या भूतानने चीनला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, हे अभयारण्य भूतानचा अविभाज्य भाग आहे.चीन आणि भूतानचे एकमेकांच्या देशात दूतावास नाहीत. नवी दिल्लीतील आपल्या दूतावासातून ते राजनैतिक संपर्क ठेवतात. अर्थात, चीनने स्पष्ट केले आहे की, हा वाद खूप जुना आहे.पश्चिम आणि मध्य भागातील या विषयावर चीनशी चर्चा करण्यासाठी भूतान तयार आहे. चीनने सकतेंग वन्यजीव अभयारण्याची ६५० चौरस कि.मी. जागा आपली असल्याचा दावा केला आहे.चीन देणार पाकिस्तानला चार ड्रोननवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीन आता पाकिस्तानला चार ड्रोन देण्याच्या तयारीत आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि ग्वादरमध्ये तयार होत असलेल्या चिनी नौदलाच्या तळाचे संरक्षण करण्यासाठी चीन हे पाऊल उचलत आहे.ग्वादर हे ठिकाण बलुचिस्तानच्या दक्षिण पश्चिम भागात आहे. चीन येथे आपले नौदलाचे तळ उभारत आहे. पाकिस्तानमध्ये कॉरिडॉरसह अन्य प्रकल्पांत चीन जवळपास ४.४८ लाख कोटी रुपये गुंतवणूक करीत आहे.चीन आणि पाकिस्तान मिळून ४८ जीजे-२ ड्रोन बनवीत आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलासाठी चीनमध्ये याचे डिझाइन केले जात आहे. जीजे-२ हे ड्रोन विंग लूंग २ चे अत्याधुनिक मॉडल आहे. चीनने यापूर्वी आशियातील काही देशांना विंग लूंग २ ड्रोन विक्री केले होते. २००८ ते २०१८ या काळात चीनने कजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अल्जिरिया, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातसह एक डझन देशांना १६३ ड्रोन वितरित केले आहेत.हे ड्रोन टेहळणी तर करतातच; पण गोपनीय माहिती एकत्र करतात आणि लक्ष्यावर हल्ला करतात. अशा प्रकारच्या ड्रोनसाठी भारत अमेरिकेशी सतत संपर्क करीत आहे. या ड्रोनचा उपयोग सध्या लिबियात तुर्की समर्थित सरकारविरुद्ध यशस्वीपणे केला जात आहे.

टॅग्स :chinaचीनBhutanभूतानIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश