शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

चीनला अमेरिकेची Apple देणार टक्कर; स्वस्त iPhone चे चालविणार 'चक्कर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 18:12 IST

कॅलिफोर्नियाची कंपनी असलेली अॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील.

नवी दिल्ली : चीनच्या कंपन्यांनी स्वस्तात मस्त स्मार्टफोन बाजारात आणून मोठमोठ्या कंपन्यांचे बँड वाजवले आहेत. त्यात अॅपल आणि सॅमसंग या कंपन्या टिकून आहेत. चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लसने 25 हजारांपेक्षाही कमी किंमतीत स्मार्टफोन आणण्याचे जाहीर केल्याने आता या किंमत युद्धात अमेरिकेची अॅपलही उतरली आहे. 

कॅलिफोर्नियाची कंपनी असलेली अॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील. या सोबतच कंपनी ५जी असलेले फोन लाँच करणार आहे. मात्र, ४जीचे फोन भारतासारख्या ४जी सेवा असलेल्या देशांमध्ये लाँच केले जाणार आहेत. या बाजारांमध्ये आयफोनच्या किंमतीही कमी केल्या जाणार आहेत. यामुळे महागडे आयफोन घेऊ न शकणारे लोकही याकडे वळतील अशी अपेक्षा कंपनीला आहे. 

अॅनालिस्ट डॅनिअल इव्स यांच्यानुसार LTE इनेबल्ड iPhone 12 ची किंमत 549 यूएस डॉलर (41,500 रुपये)पासून असणार आहे. याशिवाय दुसऱ्या आयफोनचे 4G मॉडेल iPhone 12 Max असू शकते. याची किंमत 649 यूएस डॉलर (49,000 रुपये) असू शकणार आहे. अॅपल आता आयफोनची ५जी मॉडेल आणणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता स्वस्त ४जी मॉडेलकडे लक्ष दिले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन ४जी आयफोन 12 च्या मॉडेलची नावे ठरविण्यात आलेली नाहीत. कदाचित आयफोन 12 हे नाव नसणार आहे. कारण त्याचा ५जीच्या मॉडेलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या ४ जी मॉडेलमध्ये एलसीडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. दुसरे अॅनलिस्ट जुन झांग यांनी आणखी काही माहिती शेअर केली आहे. त्यांनी 2019 मध्येच सांगितले होते, की आयफोनचे 6 फोन लाँच केले जाऊ शकतात. यामध्ये 4जी वाले फोनही असतील. तसेच एलसीडी डिस्प्ले असेल. 

वनप्लसही आणणार स्वस्त फोनवनप्लस या चीनच्या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने यंदाचे फ्लॅगशिप हँडसेट OnePlus 8  आणि OnePlus 8 Pro लाँच केले आहेत. काही दिवसांपूर्वीच 25000 च्या आतील फोन बाजारात येणार असल्याचे संकेत दिलेले असताना पुन्हा काहीतरी नवीन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने वनप्लस Z/OnePlus Nord ची घोषणा केली आहे. या फोनचे लाँचिंगही लवकरच करण्यात येणार आहे. 

वनप्लस झेडमध्ये काय काय? वनप्लस झेडबाबत गेल्या काही काळापासून वातावरण तापलेले आहे. अनेक जण अनेक प्रकारच्या शक्यता व्यक्त करत आहेत. हा हँडसेट जुलैमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 90 HZ ची ओएलईडी स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 765 चिपसेट, 30 वॉट चार्जिंग आणि क्वाड कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. या वनप्लस झेडची किंमत 24000 पेक्षा कमी असण्याची शक्यता असून 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. तसेच या फोनमध्ये 4300एमएएचची बॅटरी असणार आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

OMG पोकेमॉन 'खुळे'! आजोबा सायकलवर तब्बल 64 फोन लावून खेळत हिंडतात

मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; नोकरदारांना ग्रॅच्युईटीमध्ये दिलासा देणार

चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते

सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'

टॅग्स :Apple IncअॅपलOneplus mobileवनप्लस मोबाईलchinaचीनAmericaअमेरिकाIndiaभारतsamsungसॅमसंग