Plane Crash: आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:07 IST2025-07-03T10:07:19+5:302025-07-03T10:07:38+5:30
New Jersey Plane Crash: अमेरिकेतील न्यूजर्सी येथे असाच एक भीषण अपघात घडला आहे. येथे धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटून ते विमानतळाची भिंत तोडत पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले.

Plane Crash: आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
Aircraft Crash in US: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात सुमारे २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झला होता. दरम्यान, या अपघाताला महिना उलटत नाहीत तोच अमेरिकेतील न्यूजर्सी येथे असाच एक भीषण अपघात घडला आहे. येथे धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटून ते विमानतळाची भिंत तोडत पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले. सुदैवाने एवढा भीषण अपघात घडल्यानंतरही विमानामध्ये आग लागली नाही. त्यानंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना विमानातून बाहेर काढले. तसेच पाच प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हे विमान गुरुवारी सकाळी न्यूजर्सी विमानतळाच्या धावपट्टीवरून पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले. या विमानामध्ये १५ प्रवासी होते. ग्लोस्टर कौंटी आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, मुनरो विमानतळावर आपातकालिन बिगुल वाजल्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. विमान कोसळल्यानंतर बाहेरील मैदानी परिसरामध्ये अडकले. सुदैवाने विमानाचा वेग कमी असल्याने त्यांना फार नुकसान झालं नाही.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की, आम्ही या अपघाताचा तपास सुरू केला आहे. विमान अपघात झाला तेथी जखमींना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील ओहियो येथेही एक विमान अपघात झाला होता. त्यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
या अपघातात कुणीही मृत्युमुखी पडलेलं नाही. हे विमान स्कायडायव्हिंगशी संबंधित होते. कदाचित तांत्रिक बिघाड, वैमानिकाची चूक किंवा खराब हवामानामुळे ते अपघातग्रस्त झाले असावे, असे एफएएने म्हटले आहे.