Middle East War: मध्य पूर्वेतील युद्धात अमेरिकेची दमछाक, इराणने रचलेल्या चक्रव्यूहात ट्रम्प कसे अडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:45 IST2026-04-02T17:44:32+5:302026-04-02T17:45:46+5:30

Middle East Crisis: मध्यपूर्वेतील युद्ध आता एका अशा वळणावर आले आहे, जिथे महासत्ता असलेल्या अमेरिकेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

America's exhaustion in the Middle East war, how did Trump get caught in the maze created by Iran? | Middle East War: मध्य पूर्वेतील युद्धात अमेरिकेची दमछाक, इराणने रचलेल्या चक्रव्यूहात ट्रम्प कसे अडकले?

Middle East War: मध्य पूर्वेतील युद्धात अमेरिकेची दमछाक, इराणने रचलेल्या चक्रव्यूहात ट्रम्प कसे अडकले?

मध्यपूर्वेतील इराण-इस्रायलयुद्ध आता एका अशा वळणावर आले आहे, जिथे अमेरिकेची ताकद कमी पडताना दिसत आहे. इराणने रचलेल्या चक्रव्यूहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडकले असून ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू असूनही अमेरिकेला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

मध्ये पूर्वेतील युद्धादरम्यान इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल पुरवठा मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला आहे. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला असून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. विशेष म्हणजे इराणने भारत, रशिया आणि चीन यांसारख्या मित्र राष्ट्रांसाठी हा मार्ग खुला ठेवला आहे. मात्र, शत्रू राष्ट्रांची कोंडी केली आहे. तसेच अमेरिकेच्या लष्करी कारवायांमुळे सौदी अरेबिया, युएई, बहरीन आणि कुवेत यांसारख्या खाडी देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इराण थेट या देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करत असल्याने, या देशांचा अमेरिकेवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. शिवाय,  इराणने आता बचावात्मक पवित्रा सोडून आक्रमक पवित्रा घेतला आहे. कतारमधील अल उदीद आणि युएईमधील अल धाफरा यांसारख्या अमेरिकन एअरबेसवर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. यात अमेरिकेचे मौल्यवान 'E-3 AWACS' विमान नष्ट झाले असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत.

अमेरिकेसमोर आर्थिक आणि लष्करी संकट

या युद्धात अमेरिकेला दररोज साधारण १ अब्ज डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. पाचव्या आठवड्यातच अमेरिकेचा क्षेपणास्त्र साठा संपत आल्याचे अहवाल आहेत. तसेच फ्रान्स, ब्रिटन आणि स्पेन यांसारख्या नाटो  मित्रराष्ट्रांनी या युद्धात थेट सहभागी होण्यास नकार दिल्याने ट्रम्प प्रशासनाची कोंडी झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इराणला कडक इशारा दिला आहे. "आम्ही इराणला पुन्हा अश्मयुगात पाठवू," अशी धमकी त्यांनी दिली आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकेला हे युद्ध जिंकणे अपेक्षेपेक्षा कठीण जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतासाठी इराणचा महत्त्वाचा मेसेज

या तणावाच्या परिस्थितीतही इराणने भारताला मित्र संबोधले असून, भारतीय जहाजांना आणि व्यापाराला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे आश्वासन दिले आहे. सध्याच्या परिस्थितीत इराणने अमेरिकेला लष्करी आणि आर्थिक अशा दोन्ही आघाड्यांवर घेरले असून, ट्रम्प प्रशासन यातून मार्ग कसा काढते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : मध्य पूर्व युद्ध में अमेरिका कमजोर; ईरान के चक्रव्यूह में ट्रम्प फंसे।

Web Summary : मध्य पूर्व युद्ध में ईरान की रणनीतिक चालें अमेरिकी शक्ति को चुनौती दे रही हैं। होर्मुज जलडमरूमध्य को बंद करने से वैश्विक तेल प्रभावित, सैन्य कार्रवाई से अमेरिकी संसाधन और गठबंधन तनावग्रस्त। ईरान के प्रभुत्व के बीच ट्रम्प आर्थिक और सैन्य संकटों का सामना कर रहे हैं।

Web Title : US falters in Middle East war; Trump trapped by Iran's strategy.

Web Summary : Iran's strategic moves in the Middle East war are challenging US power. Closing Strait of Hormuz impacts global oil, while military actions strain US resources and alliances. Trump faces economic and military crises as Iran asserts dominance.