अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल-ट्रम्पचा विनाश अटळ : संतप्त इराणचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:33 IST2026-03-06T05:33:15+5:302026-03-06T05:33:29+5:30

सहाव्या दिवशी आखात पेटलेले, जोरदार हल्ले सुरूच इराणमधील एक धर्मगुरू अयातुल्ला अब्दुल्ला जवादी अमोली यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून इस्रायल व ट्रम्पचा विनाश करावा असे थेट आवाहन देशवासियांना केले. 

America's brutal actions, Israel-Trump's destruction is inevitable: Angry Iran warns | अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल-ट्रम्पचा विनाश अटळ : संतप्त इराणचा इशारा 

अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल-ट्रम्पचा विनाश अटळ : संतप्त इराणचा इशारा 

दुबई : इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाच्या सहाव्या दिवशी इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या १४ हून अधिक आखाती व अन्य देशातील लष्करी तळांवर क्षेपणास्त्राने हल्ले केले. 

या दरम्यान बुधवारी श्रीलंकेजवळ अमेरिकेने इराणी युद्धनौकेवर टॉर्पोडोने हल्ला करून ती उद्ध्वस्त केली होती, या हल्ल्याचा अमेरिकेला पश्चाताप करावा लागेल, अशी धमकी इराणने दिली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी 'आयआरआयएस देना' ही युद्धनौका बुडवणे हे अमेरिकेच्या नौदलाचे क्रूर कृत्य असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने जो पायंडा पाडला आहे, त्याबद्दल त्यांना पश्चात्ताप व्यक्त करावा लागेल, अशी धमकीही त्यांनी दिली. तर इराणमधील एक धर्मगुरू अयातुल्ला अब्दुल्ला जवादी अमोली यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून इस्रायल व ट्रम्पचा विनाश करावा असे थेट आवाहन देशवासियांना केले. 

या युद्धात इराणमधील मृतांचा आकडा १,२३० तर लेबनॉनमधील आकडा ७० हून अधिक झाला आहे. तर इस्रायलमधील मृतांचा आकडा एक डझनहून अधिक झाला आहे. अमेरिकेचे ६ सैनिक ठार झाले आहेत.

इस्रायलचे हिजबुल्लाहवर हल्ले
इस्रायलने लेबनॉनमधील इराण समर्थित हिजबुल्लाच्या ८० तळांवर तीव्र हल्ले केले. इस्रायलने बैरूतच्या दक्षिण उपनगरातील रहिवाशांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने घर खाली करा अशा सूचनाही दिल्या. 

कुर्दीश मुख्यालय उद्ध्वस्त
इराणने उत्तर इराकमधील इराणी कुर्दिश दलाच्या लष्करी मुख्यालय तीन क्षेपणास्त्रे डागून उद्ध्वस्त केले. त्यात एकजण ठार झाला. कुर्दीश बंडखोर इराणविरोधात युद्धात उतरल्याने इराणने कुर्दीस्तान आता लक्ष्य केले.

अखेर अली खामेनेईंच्या निधनावर भारताचा शोक
नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाबद्दल भारताने गुरुवारी अधिकृतपणे शोक संवेदना प्रकट केल्या. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणच्या दूतावासाला भेट देऊन तेथील शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. यावेळी इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली हे उपस्थित होते. फथाली व मिस्री यांच्यातील चर्चेचे  छायाचित्र नंतर प्रसिद्ध करण्यात आले.

भारत सरकारची सावध भूमिका
पश्चिम आशियातील युद्धपरिस्थिती संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवावी, असे आवाहन भारताने सातत्याने केले असले, तरी खामेनेई यांच्या हत्येवर थेट प्रतिक्रिया देणे भारताने टाळले होते. 

मोदी-मॅक्रॉन यांच्यात चर्चा 
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आखात युद्धावर संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला. 

Web Title : ईरान की अमेरिका को चेतावनी: क्रूर कृत्य के बाद इजरायल-ट्रम्प का विनाश तय

Web Summary : श्रीलंका के पास अमेरिकी युद्धपोत द्वारा ईरानी युद्धपोत को नष्ट करने के बाद ईरान ने जवाबी कार्रवाई की धमकी दी। ईरान ने इजरायली और अमेरिकी ठिकानों को निशाना बनाया। भारत ने खमेनी की मौत पर शोक व्यक्त किया, बढ़ते तनाव के बीच कूटनीति की वकालत की।

Web Title : Iran Warns America: Israel-Trump's Destruction Inevitable After Cruel Act

Web Summary : Iran threatens retaliation after America allegedly destroyed its warship near Sri Lanka. Iran targeted Israeli and US bases. India expressed condolences over Khamenei's death, advocating diplomacy amid rising tensions.