अमेरिकेचे ११ अब्ज डॉलर्स बुडाले! इराणसमोर महासत्तेची दमछाक; ट्रम्प प्रशासनाचा युद्धातील खर्चाचा 'हा' आकडा पाहून जग हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:26 IST2026-03-12T13:24:53+5:302026-03-12T13:26:27+5:30

२८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केल्यानंतर दोन दिवसांत अमेरिकेने ५ अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, इराणने आखाती देशांवर हल्ला करून आणि प्रमुख जलमार्ग अडवून अमेरिकेवर दबाव वाढवला आहे.

America's $11 billion has been lost Shocking statistics about the Iran war have emerged | अमेरिकेचे ११ अब्ज डॉलर्स बुडाले! इराणसमोर महासत्तेची दमछाक; ट्रम्प प्रशासनाचा युद्धातील खर्चाचा 'हा' आकडा पाहून जग हादरलं

अमेरिकेचे ११ अब्ज डॉलर्स बुडाले! इराणसमोर महासत्तेची दमछाक; ट्रम्प प्रशासनाचा युद्धातील खर्चाचा 'हा' आकडा पाहून जग हादरलं

अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे प्रमुख नेत्यांसह अनेकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून  इराणमधील युद्ध वाढतच चालले आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणवर क्षेपणास्त्रांचा मारा करत असताना, इराणने त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. परिणामी, युद्ध लांबत चालले आहे. दरम्यान, या युद्धात अमेरिकेच्या खर्चाबाबत काही दिवसापूर्वी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अमेरिका या युद्धात भरमसाठ पैसे ओतत आहे.

इराण आता थेट अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत; आत्मघातकी ड्रोन समुद्रकिनाऱ्यांजवळ? FBI चा खळबळजनक अलर्ट!

युद्धाच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेने किमान ११.३ अब्ज डॉलर्स खर्च केल्याचा अहवाल पेंटागॉनने दिला आहे. युद्धाच्या पहिल्या दोन दिवसांत अमेरिकेने अंदाजे ५ अब्ज डॉलर्स खर्च केल्याचा दावा अहवालांनंतर हा नवीन आकडा समोर आला आहे.

ऑपरेशन एपिक फ्युरीचा खर्च

अमेरिकन अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी या प्रकरणाबाबत एक गुप्त बैठक घेतली. बंद दाराआड झालेल्या ब्रीफिंग दरम्यान हा ११.३ अब्ज डॉलर्सचा आकडा कायदेकर्त्यांना सादर करण्यात आला. कायदेकर्त्यांना ऑपरेशन एपिक फ्युरीशी संबंधित इतर अपडेट्स देखील देण्यात आले.

युद्ध थांबवणार?

इराणमधील युद्ध लवकरच संपू शकते, असा दावा ट्रम्प यांनी काल केला. अमेरिकेने आता जवळजवळ सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. अ‍ॅक्सिओसला दिलेल्या फोन मुलाखतीत युद्धाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले, "युद्ध खूप चांगले सुरू आहे. आम्ही आमच्या वेळापत्रकापेक्षा खूप पुढे आहोत. हल्ल्यांमुळे अपेक्षेपेक्षा खूप जास्त नुकसान झाले आहे, असंही ट्रम्प यांनी सांगितले.

Web Title : ईरान संघर्ष में अमेरिका को 11 अरब डॉलर का नुकसान; चौंकाने वाला युद्ध खर्च

Web Summary : पेंटागन की रिपोर्ट के अनुसार, ईरान संघर्ष के पहले सप्ताह में अमेरिका ने 11.3 बिलियन डॉलर खर्च किए। हमलों और जवाबी खतरों के बाद तनाव बढ़ रहा है। ट्रम्प का दावा है कि अमेरिका ने अपने उद्देश्य हासिल कर लिए हैं और युद्ध अच्छी तरह से आगे बढ़ रहा है, जो अपेक्षाओं से अधिक है।

Web Title : US Suffers $11 Billion Loss in Iran Conflict; Shocking War Cost

Web Summary : The US has spent $11.3 billion in the first week of the Iran conflict, according to a Pentagon report. Escalating tensions follow attacks and retaliatory threats. Trump claims the US has achieved its objectives and the war is progressing well, exceeding expectations.