शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रहार, केवळ तीनच आठवड्यांत 1.6 कोटी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 9:38 PM

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या देशात केवळ संक्रमितांचीच ...

ठळक मुद्दे66 लाख लोकांचा बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज दोन लाख कोटी डॉलर्सचा सहायता निधीही ठरला कुचकामीअमेरिकेची जवळपास 97 टक्के लोकसंख्या घरात

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या देशात केवळ संक्रमितांचीच संख्या वाढत आहे, असे नाही. तर येथील अर्थव्यवस्थेवरही कोरोनाने घणाघातील प्रहार करायला सुरुवात केली आहे. येथील अर्थव्यवस्था आता पटरीवरून खाली घसरू लागली आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे, कोरोना महामारीने गेल्या तीन आठवड्यात येथील तब्बल दीड कोटीहून अधिक लोकांना बेरोजगारीच्या गर्तेत ढकलले आहे. 

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, आगामी काही महिन्यात देशाची अर्थव्यवस्था पटरीवर येईल, असा विश्वास दर्शवला आहे. येथे आतापर्यंत जवळपास 4 लाख 70 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास 17 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

66 लाख लोकांचा बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज -कोरोनामुळे 33 कोटी एवढी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळपास 97 टक्के लोकसंख्या घरात कैद झाली आहे. उद्योग धंदे ठप्प आहेत. हवाई वाहतुकीत 96 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या केवळ तीन आठवड्यांतच 1.6 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. याकाळात तब्बल 66 लाख अमेरिकन नागरिकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला आहे. या आकड्यांवरून स्पष्ट होते, की दोन लाख कोटी डॉलरचे (जवळपास 150 लाख कोटी रुपये) सहायता निधीही कुचकामी ठरला आहे. 

ट्रम्प म्हणाले, अर्थव्‍यवस्‍था अधिक चांगली होईल -या आकड्यांवर शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, 'मला वाटते, की अर्थव्यवस्था अधिक चांगली होईल. आपल्याकडे चांगल्या योजना आहेत. एवढेच नाही तर आपण कृषीमंत्र्यांना कोरोनाचा फटका बसलेल्या अमेरिकेतील शेतकऱ्यांनाही तत्काळ मदत करण्यात यावी, असा आदेश दिला आहे.

रुग्णालयांतील रुग्णांच्या संख्येत घट -आपण मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत होत आसलेली वाढ पाहत आहोत. मात्र, रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. यावरून असे वाटते, की सर्व काही योग्य प्रकारे सुरू आहे, असे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शंस डिसीजचे संचालक आणि कोरोना व्हायरससंदर्भातील व्हाइट हाऊस टास्क फोर्सचे सदस्य अँटनी फासी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाEmployeeकर्मचारीUnited StatesअमेरिकाUSअमेरिकाEconomyअर्थव्यवस्था