इराणमधील शाळेवरील भीषण हल्ल्यामागे अमेरिकेचाच हात; टॉमहॉक क्षेपणास्त्रानेच घेतला १६५ विद्यार्थ्यांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 06:10 IST2026-03-10T06:10:09+5:302026-03-10T06:10:33+5:30

'बेलिंगकॅट'च्या तीन सेकंदांच्या व्हिडीओने अमेरिकेचा बुरखा फाडला, ट्रम्प यांचा दावा खोटा, अमेरिकेच्या अडचणींत वाढ

America was behind the horrific attack on a school in Iran; 165 students were killed by a Tomahawk missile | इराणमधील शाळेवरील भीषण हल्ल्यामागे अमेरिकेचाच हात; टॉमहॉक क्षेपणास्त्रानेच घेतला १६५ विद्यार्थ्यांचा बळी

इराणमधील शाळेवरील भीषण हल्ल्यामागे अमेरिकेचाच हात; टॉमहॉक क्षेपणास्त्रानेच घेतला १६५ विद्यार्थ्यांचा बळी

जेरुसलेम : मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या सुरुवातीला इराणमधील एका शाळेवर झालेला हल्ला हा इराणनेच केल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता; पण नव्या पुराव्यांमुळे ट्रम्प संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आंतरराष्ट्रीय तपास संस्था ‘बेलिंगकॅट’ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओतून हा हल्ला अमेरिकेकडून झाल्याचे म्हटले आहे. 
   
२८ फेब्रुवारी रोजी इराणच्या दक्षिणेकडील हॉर्मोझगान प्रांतातील मिनाब येथे रिव्होल्युशनरी गार्डच्या तळाजवळ असलेल्या शाळेवर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात १६५ हून अधिक जण ठार झाले होते, यात मोठ्या संख्येने विद्यार्थी होते. या घटनेनंतर संपूर्ण जगात संताप व्यक्त झाला होता. पण, या हल्ल्याला अमेरिकेने इराणलाच जबाबदार धरले होते. 

बेलिंगकॅटने प्रसिद्ध केलेला तीन सेकंदांचा व्हिडीओ त्या दिवशीचा असल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओत क्षेपणास्त्र एका इमारतीवर कोसळताना दिसते. ही इमारत शाळेजवळ होती. हे क्षेपणास्त्र टॉमहॉक होते असे तपास संस्थेचे संशोधक ट्रेव्हर बॉल यांचे म्हणणे आहे. हे क्षेपणास्त्र अतिशय संहारक असून, ते या संघर्षात फक्त अमेरिकेकडे आहे. अमेरिकेने ज्या ठिकाणी हल्ला केला ती शाळा रिव्होल्युशनरी गार्डच्या तळाजवळ आणि नौदलाच्या छावणीच्या परिसरात होती. अमेरिकेने या भागात हल्ले केल्याचे मान्य केले आहे. इस्रायलने या हल्ल्यात आपण सामील नव्हतो असे स्पष्ट केले होते. 

भारतीय जखमी

जेरुसलेम : इस्रायलवर इराणकडून रविवारी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकाच्या मानेत क्षेपणास्त्राच्या तुकड्यातील अणकुचीदार कण घुसल्याने तो जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. या व्यक्तीवर तेल अवीव येथील इचिलोव रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

‘भारतीयाचा मृत्यू नाही’

दुबई : सौदी अरेबियातील अल खार्ज या वसाहतीवर इराणने डागलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती रियाध येथील भारतीय दूतावासाने दिली. रविवारीच्या घटनेत भारतीय नागरिक जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे दूतावासाने सांगितले होते. 

इस्रायलकडून संहारक ‘व्हाइट फॉस्फरस’चा वापर

१. बैरूत : इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनवरील हल्ला करताना व्हाइट फॉस्फरसयुक्त तोफगोळ्यांचा वापर केला आहे. हे रसायन अत्यंत ज्वलनशील असून त्याचा वापर बेकायदा असल्याचा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ‘ह्युमन राइट्स वॉच’ने केला.

२. या संघटनेने ७ छायाचित्रांचे भू-स्थान तपासून व पडताळणी करून सांगितले की इस्रायलने योहमोर या गावातील निवासी भागांवर तोफांद्वारे व्हाइट फॉस्फरसचे हल्ले केले. हा हल्ला इस्रायली सैन्याने येथील रहिवाशांना स्थलांतराची सूचना दिल्यानंतर काही तासांत केला होता. या हल्ल्यात किती मृत वा जखमी झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

कायद्याचे उल्लंघन

१. लोकवस्ती असलेल्या भागात व्हाइट फॉस्फरसचा वापर आंतरराष्ट्रीय कायद्याने निषिद्ध आहे. ही रसायनयुक्त आग इमारतींना पेटवू शकते आणि मानवी शरीर जाळून हाडांपर्यंत पोहोचते. या रसायनांचा जिवंत बचावलेल्यांना संसर्ग होऊ शकतो. 

२. अवयव निकामी होऊ शकतात किंवा श्वसनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतात, असे या संघटनेचे म्हणणे आहे. इस्रायलचे हे कृत्य बेकायदा असून चिंताजनक आहे. याचा परिणाम गंभीर आहे, असे या संघटनेने म्हटले आहे. इस्रायलने या आरोपांवर तत्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title : ईरान स्कूल हमले के पीछे अमेरिका का हाथ; कई लोगों की मौत: रिपोर्ट

Web Summary : एक रिपोर्ट के अनुसार, ईरान में स्कूल पर हुए हमले के पीछे अमेरिका था, जिसमें कई लोग मारे गए, संभवतः टॉमहॉक मिसाइलों का उपयोग किया गया। इजरायल ने शामिल होने से इनकार किया। अलग से, इजरायल में ईरानी मिसाइल हमले में एक भारतीय घायल हो गया। लेबनान में इजरायल द्वारा सफेद फास्फोरस के उपयोग पर चिंता बढ़ रही है।

Web Title : Report alleges US responsible for Iran school attack; many dead.

Web Summary : A report suggests the US was behind an Iranian school attack that killed many, potentially using Tomahawk missiles. Israel denies involvement. Separately, an Indian was injured in an Iranian missile attack in Israel. Concerns rise over Israel's use of white phosphorus in Lebanon.