"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:38 IST2026-04-05T12:35:23+5:302026-04-05T12:38:24+5:30

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या थरारक मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प यांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी 'सर्च अँड रेस्क्यू' ऑपरेशन्सपैकी एक म्हटले आहे...

America US rescue pilot donald trump confirms and tells the inside story of the thrilling mission to rescue a soldier from enemy jaws | "हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'

"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'


मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धात इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन लढाऊ विमानातील वायू सैनिकाला अमेरिकेने एक अत्यंत धाडसी आणि थरारक मोहीम आखत सुरक्षितपणे बाहर काढले. खरेतर ही मोहीम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या थरारक मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प यांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी 'सर्च अँड रेस्क्यू' ऑपरेशन्सपैकी एक म्हटले आहे.

इराणने अमेरिकन हवाई दलाचे F-15E स्ट्राईक ईगल विमान दक्षिण इराणमध्ये पाडले होते. विमानात एक पायलट आणि एक वेपन सिस्टम ऑफिसर असे दोन क्रू मेंबर्स होते. विमानाला आग लागण्यापूर्वीच दोघांनी यशस्वीपणे इजेक्ट केले. पायलटला काही तासांतच वाचवण्यात अमेरिकेला यश आले. मात्र दुसऱ्या क्रू मेंबरचा शोध घेणे जरा आव्हानात्मक ठरले. हा सैनिक इराणच्या दुर्गम डोंगराळ भागात लपून शत्रू सैन्यापासून स्वतःचा बचाव करत होता. सुमारे एक दिवस हा सैनिक शत्रूच्या जबड्यात एकटाच होता. पकडले जाण्यची  भीतीही होती. मात्र त्याला शोधण्यात अमेरिकेला यश आले.

या बचाव मोहिमेसंदर्भात काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? - 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेसंदर्भात त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, "आम्ही त्याला शोधून काढले. ही आपल्या इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक आहे. हा शूर सैनिक इराणच्या पर्वतांमध्ये, शत्रूच्या प्रदेशात लपलेला होता. शत्रू त्याचा शोध घेत होते." तसेच, संबंधित वैमानिकाच्या प्रकृतीसंदर्भात सांगताना ट्रम्प म्हणाले, "तो काही दुखापत जाली आहे, तो पूर्णपणे बरा होईल."

सीआयएची म्हत्वाची भूमिका - 
अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने (CIA) या मोहिमेसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी सीआयएने वैमानिक आधीच सापडल्याची अफवा पसरवली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे नेमके लोकेशन शोधून सैन्याला दिले. बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकन स्पेशल फोर्सेसने जोरदार हवाई संरक्षण (Fire Cover) आणि गरजेनुसार एअरस्ट्राइकचा वापर करत आपल्या सैनिकाला बाहेर काढले.

Web Title : ट्रंप ने ईरान में दुश्मन के इलाके से सैनिक के बचाव का खुलासा किया

Web Summary : ट्रंप ने ईरान में एक साहसी अमेरिकी बचाव अभियान की पुष्टि की, जिसमें एक सैनिक को दुश्मन से बचाया गया। सीआईए ने मुश्किल इलाके में सैनिक का पता लगाने में अहम भूमिका निभाई, जो एक बड़ी सफलता है।

Web Title : Trump Reveals Daring Rescue of Soldier from Enemy Territory in Iran

Web Summary : Trump confirmed a daring US rescue operation in Iran, saving a soldier from enemy capture. The CIA played a key role in locating the soldier amidst challenging terrain, marking a significant success.