अमेरिकेचे आणखी एक पाऊल मागे, १० दिवस हल्ले नाहीत; ट्रम्प म्हणाले, “इराणची विनंती मान्य...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 05:13 IST2026-03-27T05:11:29+5:302026-03-27T05:13:07+5:30

Donald Trump New Decision On War: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सुरू असून त्या सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

america takes another step back now no attacks for 10 days till 6 april 2026 donald trump said as per iran govt request take decision | अमेरिकेचे आणखी एक पाऊल मागे, १० दिवस हल्ले नाहीत; ट्रम्प म्हणाले, “इराणची विनंती मान्य...”

अमेरिकेचे आणखी एक पाऊल मागे, १० दिवस हल्ले नाहीत; ट्रम्प म्हणाले, “इराणची विनंती मान्य...”

Donald Trump New Decision On War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक पाऊल मागे घेतले आहे. पुढील १० दिवस इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. इराणच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 

‘ट्रुथ सोशल’ या वेबसाइटवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, इराण सरकारच्या विनंतीवरून वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याची कारवाई १० दिवस थांबवत आहे. सोमवार, ०६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत हा निर्णय लागू राहील. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सुरू असून त्या सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत. चर्चा सुरू असून त्या खूप चांगल्या प्रकारे सुरू आहेत, असे सांगत ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवरील वृत्ते फेटाळून लावली.

ट्रम्प नरमले, पण इस्रायल ऐकायला तयार नाही

युद्ध तीव्र झाल्यापासून अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य करणारे हल्ले औपचारिकपणे कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु, दुसरीकडे इस्रायल ऐकत नसल्याचे समोर येत आहे. इस्रायलकडून इराणच्या अनेक ठिकाणांवर हल्ले सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. १० दिवस हल्ले न करण्याचा निर्णय म्हणजे युद्ध थांबण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून, यामुळे राजनैतिक वाटाघाटींचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या तात्पुरत्या उपायाचे रूपांतर सर्वसमावेशक युद्धविरामात होईल की, केवळ तणाव कमी करण्याचा एक उपाय ठरेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही म्हटले जात आहे. 

दरम्यान, ट्रम्प यांनी दावा केला होता की इराणने अमेरिकेला एक अत्यंत मौल्यवान भेट पाठवली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून १० तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणने सुरुवातीला आठ जहाजांची मागणी केली होती, त्यातील काहींवर पाकिस्तानी झेंडा होता. अखेरीस ही संख्या १० पर्यंत वाढली.

 

Web Title : ट्रंप ने ईरान पर हमले 10 दिनों के लिए रोके, ईरान का अनुरोध

Web Summary : ट्रंप ने ईरान के अनुरोध पर 10 दिनों के लिए ईरान के बिजली संयंत्रों पर हमले रोक दिए हैं। इजराइल के हमले जारी हैं, लेकिन कुछ विशेषज्ञ इसे शांति वार्ता और संभावित युद्धविराम की दिशा में एक कदम के रूप में देखते हैं। ईरान ने 10 तेल टैंकरों को भी जाने दिया।

Web Title : Trump Halts Iran Attacks for 10 Days Following Request

Web Summary : Trump suspended attacks on Iran's power plants for 10 days after a request from Iran amid ongoing negotiations. While Israel continues attacks, some experts see this as a step towards peace talks and a potential ceasefire. Iran also allowed passage of 10 oil tankers.