'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:16 IST2025-06-25T15:13:40+5:302025-06-25T15:16:19+5:30

America-Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांची फोनवर चर्चा झाली.

America-Russia: 'I don't need your help...', what offer did Putin make? Donald Trump's refuses | 'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार

'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार

America-Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामासाठी त्यांना फोन केला होता. पण, ट्रम्प यांनी पुतिन यांची मदत नाकारली. तसेच, इराण-इस्रायल सोडून युक्रेनसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यास मदत करण्याचे आाहन केले. तसेच, रशिया-युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी रशियासोबत लवकरच एक करार होऊ शकतो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट होणार
ट्रम्प हे नाटो शिखर परिषदेदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचीही भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये ऑन कॅमेरा शाब्दिक वादही झाला होता. त्या वादाची जगभरात चर्चा झाली. त्या वादानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामानंतर, ट्रम्प यांचे लक्ष आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धविरामावर आहे, ज्यासाठी ते सत्तेत आल्यापासून प्रयत्न करत आहेत.

१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प म्हणाले होते की, ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर २४ तासांच्या आत रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करतील, परंतु हे शक्य झाले नाही. त्यानंतर १०० दिवसांचे लक्ष्य ठेवण्यात आले. १०० दिवसांची मुदत संपल्यानंतरही रशिया-युक्रेन प्रकरणात काहीही महत्त्वाचे यश मिळालेले नाही. पण, ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळेच रशिया आणि युक्रेन वाटाघाटीच्या टेबलावर आले आहेत. 

अलिकडेच तुर्कीमध्ये दोन्ही बाजूंमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. २ जून रोजी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेत दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या देशांमध्ये तुरुंगात असलेल्या त्यांच्या सैनिकांची सुटका करण्याचे मान्य केले. यामध्ये युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांचे मृतदेह परत आणणे देखील समाविष्ट आहे. रशियाने ६,००० हून अधिक युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह परत केले आहेत, तर युक्रेनने ५९ सैनिकांचे मृतदेह दिले आहेत. 

NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...

Web Title: America-Russia: 'I don't need your help...', what offer did Putin make? Donald Trump's refuses