“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 09:05 IST2025-06-06T09:00:41+5:302025-06-06T09:05:17+5:30

Donald Trump And Elon Musk News: मी इलॉनवर खूप नाराज आहे. मी इलॉनला खूप मदत केली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

america president donald trump displeasure on elon musk and said i do not know our friendship will remain good in future | “आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले

“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले

Donald Trump And Elon Musk News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्यातील वाद आता हळूहळू शिगेला पोहोचत असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या प्रशासनात सक्रीय असलेले इलॉन मस्क अचानक बाहेर पडले. यानंतर आता या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. मस्क यांनी केलेल्या विधानांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त करत, आता आमच्यातील मैत्री भविष्यात टिकून राहील का, ते माहिती नाही, असे म्हटले आहे. 

कर आणि खर्चाच्या बिलावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील शाब्दिक युद्धाला अधिक धार चढत आहे. यावर ट्रम्प म्हणाले की, मी इलॉनवर खूप नाराज आहे. मी इलॉनला खूप मदत केली आहे. इलॉन आणि माझ्यात खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. परंतु, भविष्यात ते तसेच राहतील की नाही, हे मला माहित नाही. मीडियाशी बोलताना ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्याबाबतची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. 

आम्ही त्यांना अब्जावधी डॉलर्सचे अनुदान द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे

ट्रम्प यांनी सांगितले की, या विधेयकाबाबत इलॉन मस्कला सगळ्यांत जास्त माहिती होती. मस्क यांनी टीका तेव्हाच सुरू झाली जेव्हा त्यांना कळले की, आपल्याला इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) खरेदी करण्यासंदर्भात कपात करावी लागेल. त्यामुळे मस्क यांच्या हितसंबंधांवर थेट परिणाम होणार होता. ईव्ही सेक्टर आधीच अडचणीत आहे आणि आता त्यांना आमच्याकडून अब्जो डॉलर अनुदान द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. आम्ही ईव्हीचे आदेश हटवला ज्यात इलेक्ट्रिक वाहनांना खूप पैसे मिळत होते हा मस्क यांना त्रास आहे. हे विधेयक खूप चांगले आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जर मी डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन केले नसते तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हरले असते. त्या परिस्थितीत डेमोक्रॅट्सना प्रतिनिधी सभेत बहुमत मिळाले असते. रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये फक्त ५१-४९ मतांनी आघाडी मिळाली असती असा दावा इलॉन मस्क यांनी केला आहे.

 

Web Title: america president donald trump displeasure on elon musk and said i do not know our friendship will remain good in future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.