2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 09:47 AM2021-07-13T09:47:24+5:302021-07-13T09:56:13+5:30

चंद्रामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला अध्ययनात 'विनाशकारी पूर' म्हणण्यात आले आहे. अशा प्रकारचे पूर किनारपट्टी भागात येतात.

America Nasa study predicts record flooding in 2030s due to moons wobble climate change rising sea levels | 2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA

2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA

Next

नवी दिल्ली - हवामान बदलामुळे (Climate Change) पृथ्वीवरील अनेक भागांतील वातावरणात बदल होतो. यामुळे अनेक देशांत पूरजन्य स्थिती निर्माण होते. विशेषतः अमेरिकेत. मात्र, एका अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की हवामान बदलासाठी पृथ्वीचा शेजारी चंद्रही असू शकतो. यासंदर्भात अमेरिकन स्पेस एजन्सी नॅशनल एअरोनॉटिक्स आणि स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (NASA) अध्ययन केले आहे. यात, हवामान बदलामुळे समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीबरोबरच चंद्राच्या आपल्या कक्षेतील परिवर्तनामुळे अथवा हालचालीमुळे पृथ्वीवर विनाशकारी पूर येतील. हे अध्ययन क्लायमेट चेन्जवर आधारीत जर्नल नेचरमध्ये 21 जूनला प्रसिद्ध झाले आहे. (America Nasa study predicts record flooding in 2030s due to moons wobble climate change rising sea levels)

चंद्रामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला अध्ययनात 'विनाशकारी पूर' म्हणण्यात आले आहे. अशा प्रकारचे पूर किनारपट्टी भागात येतात. यामुळे घर आणि रस्ते पाण्याखाली जातात. अशा स्थितीत व्यापारासाठीही समस्या निर्माण होते आणि दिनचर्याही प्रभावीत होते.

'दशकभर राहणार अशी स्थिती' -
नासाच्या अध्ययनानुसार, ही  पूरजन्य परिस्थिती 2030 च्या मध्यात अधिक घातक बनेल आणि अनियमितदेखील असेल. अध्ययनात म्हणण्यात आले आहे, की अमेरिकेच्या किनारपट्टी भागांत समुद्राच्या लाटा आपल्या सामान्य उंचीपेक्षा तीन ते चार फूट अधिक ऊंच उसळतील आणि असे संपूर्ण दशकभर सुरूच राहील. मात्र, ही पूरजन्य स्थिती संपूर्ण वर्षात नियमित राहणार नाही. तर काही महिन्यांदरम्यान ही स्थिती राहील. यामुळे याचा धोका आणखी वाढेल.

'किनरपट्टी भागाला अधिक धोका' -
नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन म्हणाले, "समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीमुळे  खालच्या भागांवरील संकट सातत्याने वाढत आहे आणि वारंवार पूर येत असल्याने लोकांच्या समस्याही वाढत आहेत आणि येणाऱ्या काळात आणखी वाढेल. तसेच, आपल्या कक्षेत चंद्राची स्थिती बदलल्याने गुरुत्वाकर्षण, समुद्राची वाढती पाणी पातळी आणि क्लायमेट चेन्ज एकत्रितपणे जागतिक स्थरावर किनारपट्टी भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण करेल."

'चंद्र अपल्या कक्षेत स्थिती बदलेल' -
पृथ्वीवरील पूरजन्य परिस्थितीसाठी चंद्राचा कसा प्रभाव पडतो, हे समजून सांगताना युनिव्हर्सिटी ऑफ हवाईमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि अध्ययनाचे मुख्य लेखक फिल थॉम्पसन यांना म्हटले आहे, की ' जेव्हा चंद्र आपल्या कक्षेत स्थिती बदलतो, ते पूर्ण होण्यास 18.6 वर्ष लागतात. मात्र, पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीबरोबरच हे अधिक घातक होते.'

Web Title: America Nasa study predicts record flooding in 2030s due to moons wobble climate change rising sea levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app