अमेरिका बघतच राहिली, डॉलरला धडक देण्यासाठी भारत, चीन, रशियानं नवीन 'पेमेंट सिस्टम' आणली'! ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:20 IST2026-01-30T14:16:31+5:302026-01-30T14:20:14+5:30

यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. यामुळे ट्रम्प यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे...

America kept watching India China Russia introduced a new payment system to hit the dollar Trump's tension will increase | अमेरिका बघतच राहिली, डॉलरला धडक देण्यासाठी भारत, चीन, रशियानं नवीन 'पेमेंट सिस्टम' आणली'! ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार

अमेरिका बघतच राहिली, डॉलरला धडक देण्यासाठी भारत, चीन, रशियानं नवीन 'पेमेंट सिस्टम' आणली'! ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार


ब्रिक्स (BRICS) देशांच्या वाढत्या शक्तीने अमेरिका नेहमीच अस्वस्त असते. आता या समूहाने डॉलरवरील अवलंबित्व संपवण्यासाठी एक खास मास्टर प्लॅन तयार केला आहे. भारत, चीन आणि रशियाच्या पुढाकाराने आता ब्रिक्स एक विशेष 'डिजिटल पेमेंट सिस्टम' आणण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. यामुळे ट्रम्प यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. 

थेट डिजिटल चलनाने होतील आपापसातील व्यवहार -
या पार्श्वभूमीवर, समूह नवीन चलन नव्हे तर, सदस्य देशांचे डिजिटल चलन (CBDC) एकाच प्लॅटफॉर्मला जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. यात भारताचा 'ई-रुपया', चीनचा 'डिजिटल युआन' आणि रशियाचा 'डिजिटल रुबल' यांचा समावेश असेल. या प्रणालीमुळे प्रत्येक देशाचे आपल्या चलनावर नियंत्रण राहील, आपापसातील व्यवहार थेट डिजिटल चलनाद्वारे करता येतील. यामुळे 'स्विफ्ट' सारख्या डॉलर आधारित यंत्रणेची गरज भासणार नाही.

अशी पद्धतीने चालेल काम -  
या प्रणालीमध्ये दोन मुख्य आधार असतील, एक म्हणजे, सेटलमेंट सायकल, यात प्रत्येक व्यवहाराचे तत्काळ पेमेंट न करता, ठराविक काळानंतर आयात-निर्यातीचा हिशेब करून, केवळ उरलेल्या फरकाची रक्कम दिली जाईल. यामुळे व्यवहार खर्च कमी होईल. दुसरे म्हणजे, फॉरेक्स स्वॅप लाइन, यात चलनाची कमतरता भासल्यास मध्यवर्ती बँका आपापसात चलन बदलून समतोल राखू शकतील.

चलन साठवणुकीच्या समस्येवर 'डिजिटल' तोडगा -
महत्वाचे म्हणजे, भारत-रशिया व्यवहारादरम्यान रुपया साठवणुकीची समस्याही निर्माण झाली होती. याचा विचार करता, हा बहुपक्षीय डिजिटल मार्ग प्रभावी ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे, यावर्षी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे. 

Web Title : ब्रिक्स देशों ने डॉलर को चुनौती देने के लिए नई भुगतान प्रणाली शुरू की: अमेरिका चिंतित

Web Summary : ब्रिक्स देश डॉलर पर निर्भरता कम करने के लिए ई-रुपी, डिजिटल युआन और डिजिटल रूबल वाली एक डिजिटल भुगतान प्रणाली विकसित कर रहे हैं। इस प्रणाली का उद्देश्य कुशल लेनदेन और मुद्रा संतुलन है, जो संभावित रूप से अमेरिका को प्रभावित कर सकता है।

Web Title : BRICS nations challenge Dollar with new payment system: US worried

Web Summary : BRICS countries are developing a digital payment system involving e-Rupee, Digital Yuan, and Digital Ruble to bypass dollar dependency. This system aims for efficient transactions and currency balance, potentially impacting the US.