पाकविरोधी भूमिका घेणाऱ्या अल्ताफ हुस्सेनना लंडनमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 09:01 AM2019-06-12T09:01:00+5:302019-06-12T09:01:14+5:30

पाकिस्तान मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे संस्थापक अल्ताफ हुस्सेन यांना लंडनमध्ये मंगळवारी अटक करण्यात आली.

Altaf Hussenna, who took anti-Pak roles, arrested in London | पाकविरोधी भूमिका घेणाऱ्या अल्ताफ हुस्सेनना लंडनमध्ये अटक

पाकविरोधी भूमिका घेणाऱ्या अल्ताफ हुस्सेनना लंडनमध्ये अटक

Next

लंडन/इस्लामाबाद : पाकिस्तान मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे संस्थापक अल्ताफ हुस्सेन यांना लंडनमध्ये मंगळवारी अटक करण्यात आली. देशातून हद्दपार करण्यात आल्यामुळे हुस्सेन सध्या इंग्लडमध्ये वास्तव्यास आहेत. हुस्सेन यांनी पाकिस्तानविरोधात केलेल्या भाषणांबाबत त्यांना ही अटक झाली आहे, असे स्कॉटलंड यार्डने म्हटले.

2016मध्ये केलेल्या एका भाषणामुळे त्यांना अटक केल्याची चर्चा आहे. त्या भाषणात हुस्सेन यांनी पाकिस्तानविरोधात आगपाखड केली होती. पाकिस्तान हा देश जगासाठी कॅन्सर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असल्याचीही त्यांनी टीका केली होती.


पाकिस्तानविरोधी भूमिका घेणाऱ्या 65 वर्षीय हुसेन यांच्या एमक्‍यूएमचा प्रभाव प्रामुख्याने त्या देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या कराचीत आहे. पाकिस्तानातून हद्दपार करण्यात आल्याने हुस्सेन यांनी काही वर्षांपूर्वी ब्रिटनकडे आश्रयाची विनंती केली. नंतर त्यांना ब्रिटिश नागरिकत्वही मिळाले. त्यानंतरही हुसेन यांनी पाकिस्तानविरोधी भूमिका कायम ठेवली.

Web Title: Altaf Hussenna, who took anti-Pak roles, arrested in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.