अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 14:20 IST2025-10-05T14:16:46+5:302025-10-05T14:20:22+5:30

फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) मधील डेटाची देखील तपासणी केली जात आहे असं एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Air India flight from Amritsar to Birmingham landed safely after its Ram Air Turbine deployed unexpectedly during approach | अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं

अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं

अमृतसर ते बर्मिघम जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI 117 चं लँडिंग होण्यापूर्वी अचानक इमरजेंसी सिस्टम एक्टिव झालं. ज्यानंतर बर्मिघम एअरपोर्टवर हे विमान आपत्कालीन स्थितीत लँडिंग करण्यात आले. या विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत. ही घटना प्लेनची लँडिंग प्रक्रिया सुरू असताना झाली. जेव्हा विमान रनवेवर उतरणार होते तितक्यात ही घटना घडली. या घटनेबाबत एअर इंडियाने निवेदनही जारी केले आहे.

एअर इंडियाच्या निवेदनात म्हटलंय की, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी अमृतसरहून बर्मिघमला जाणारी फ्लाईट एआय ११७ मध्ये ऑपरेटिंग क्रू ला लँडिंगपूर्वी RAT डिप्लॉयमेंटची माहिती मिळाली. तपासात सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक पॅरामीटर सामान्य आढळले. हे विमान सुरक्षित लँडिंग करण्यात आले. कुठलाही तांत्रिक बिघाड नोंदवला नाही. मानक कार्यपद्धती (SOPs) नुसार, सविस्तर तपासणीसाठी विमानाची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या विमानाचे परतीचे उड्डाण, AI114 (बर्मिंगहॅम ते दिल्ली) रद्द करण्यात आले आहे.

तसेच एअर इंडियाकडून ज्या प्रवाशांचे परतीचे उड्डाण रद्द झाले आहे त्यांच्यासाठी पर्यायी उड्डाण अथवा राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आमचे प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. सर्व यंत्रणा सामान्य आहेत, परंतु कोणत्याही संभाव्य धोक्यांना रोखण्यासाठी संपूर्ण तांत्रिक तपासणी सुरू आहे. एअरलाइनची देखभाल टीम आणि अभियांत्रिकी युनिट सध्या विमानाची तपासणी करत आहेत. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) मधील डेटाची देखील तपासणी केली जात आहे असं एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

RAT प्रणाली काय असते?

RAT म्हणजेच Ram Air Turbine, ही एक आपत्कालीन सुरक्षा प्रणाली आहे जी विमानाच्या इलेक्ट्रिकल किंवा हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड किंवा आपत्कालीन परिस्थितीत स्वयंचलितपणे सक्रिय होते. ती इंजिनखाली किंवा विमानाच्या पंखांच्या बाहेर फिरते, हवेच्या दाबाने आपत्कालीन वीज आणि हायड्रॉलिक प्रेशर तयार करते. ही यंत्रणा विमानाच्या मुख्य प्रणालींमध्ये बिघाड झाल्यावरच सक्रिय होते. मात्र या घटनेत मुख्य प्रणाली पूर्णपणे सामान्य असल्याचे आढळून आले, त्यामुळे हा तांत्रिक बिघाड नसून स्वयंचलित सुरक्षेसाठी सक्रीय झाल्याचं दिसून येते. "RAT सक्रिय करणे हे सूचित करते की विमानाच्या सुरक्षा प्रणाली योग्यरित्या कार्य करत आहेत आणि कोणत्याही संभाव्य धोक्यापूर्वी सुरक्षा प्रतिसाद सक्रिय झाला होता असं विमान तज्ञांचं मत आहे. 

Web Title : लैंडिंग से पहले एयर इंडिया विमान का RAT सक्रिय; सुरक्षित लैंडिंग, हादसा टला।

Web Summary : अमृतसर से बर्मिंघम जा रही एयर इंडिया की उड़ान में लैंडिंग से पहले इमरजेंसी सिस्टम सक्रिय हो गया। विमान सुरक्षित उतरा। यात्री और चालक दल सुरक्षित हैं, लेकिन वापसी की उड़ान रद्द कर दी गई। जांच चल रही है।

Web Title : Air India flight's RAT activated before landing; safe landing averted disaster.

Web Summary : An Air India flight from Amritsar to Birmingham experienced an emergency system activation before landing. The plane landed safely. Passengers and crew are safe, but the return flight was cancelled. Investigation is underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.