शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:40 IST

Air India: एअर इंडियाच्या बर्मिंगम-दिल्ली विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे.

Air India: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्याविमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या आणि बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता पुन्हा एकदा एअर इंडियाच्या AI114(कंपनीचे बोईंग ड्रीमलायनर 787-8 ) या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. हे विमान 21 जून रोजी बर्मिंगमहून दिल्लीला येत होते. धमकीची माहिती मिळताच विमान रियाधला वळवण्यात आले. रियाधमध्ये सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे उतरवल्यानंतर सुरक्षा तपासणी करण्यात आली. सध्या सर्व प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

एअर इंडियाने याबाबत निवेदन जारी केले आहे. त्यात कंपनीने म्हटले की, या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला दिलगीर आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. एअर इंडियाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या शौचालयाजवळ एक कागद सापडला, ज्यामध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती. हे विमान आज सकाळी 11 वाजता दिल्लीत उतरणार होते.

जयपूरमध्ये AI विमानाला बॉम्बची धमकीअहमदाबाद विमान अपघातानंतर, एअर इंडियाच्या विमानांची सुरक्षा आणि तपासणी वाढवण्यात आली आहे. याशिवाय, सतत बॉम्बच्या धमक्यांचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी जयपूर विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. हा धमकीचा संदेश व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आला होता. याच्या काही दिवस आधीही असेच काही घडले होते.

13 जून रोजी फुकेत-नवी दिल्ली विमानाला धमकीयापूर्वी 13 जून रोजी एअर इंडियाच्या विमान AI379 ला बॉम्बची धमकी मिळाली होती. हे विमान थायलंडच्या फुकेतहून नवी दिल्लीला जात होते. उड्डाणादरम्यान विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. या विमानात 156 प्रवासी होते. विमानाच्या शौचालयात एक चिठ्ठी आढळली, ज्यावर बॉम्बची धमकी लिहिलेली होती. त्यानंतर वैमानिकाने आपल्या हुशारीने आपत्कालीन परिस्थितीत अंदमान समुद्रावर प्रदक्षिणा घातली आणि विमानाला फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत उतरवले. लँडिंगनंतर, सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. थाई अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली, ज्यात स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानBombsस्फोटकेdelhiदिल्लीsaudi arabiaसौदी अरेबिया