लँडिंग करताच उडाला आगीचा भडका, कॅनडात टळला दक्षिण कोरियासारखा मोठा विमान अपघात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:36 IST2024-12-29T13:35:16+5:302024-12-29T13:36:30+5:30

Air Canada Flight Accident: दक्षिण कोरियामध्ये धावपट्टीवर उतरनाता विमान घसरून १७९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कॅनडामध्ये मोठा विमान अपघात टळला आहे. एअर कॅनडाचं विमान एसी२२५९ शनिवारी रात्री कोसळण्यापासून थोडक्यात बचावले.

Air Canada Flight Accident: A major plane crash like the one in South Korea was averted in Canada after a fire broke out on landing | लँडिंग करताच उडाला आगीचा भडका, कॅनडात टळला दक्षिण कोरियासारखा मोठा विमान अपघात  

लँडिंग करताच उडाला आगीचा भडका, कॅनडात टळला दक्षिण कोरियासारखा मोठा विमान अपघात  

दक्षिण कोरियामध्ये धावपट्टीवर उतरनाता विमान घसरून १७९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कॅनडामध्ये मोठा विमानअपघात टळला आहे. एअर कॅनडाचं विमान एसी२२५९ शनिवारी रात्री कोसळण्यापासून थोडक्यात बचावले. विमानाचा लँडिंग गिअर तुटल्याने हे विमान धावपट्टीवर घसरत त्याच्या काही भागाला आग लागली. मात्र विमानतळावरील आपत्तीव्यवस्थापन यंत्रणेने वेगाने मदतकार्य करत विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एअर कॅनडाचं हे विमान सेंट जॉन येथून हेलिफॅक्स येथे जात होतं. दरम्यान, लँडिंग गिअर तुटल्याने हेलिफॅक्स विमानतळावर हा अपघात झाला. त्यानंतर विमानतळावर एकच धावपळ उडाली. आता घटनास्थळावरील काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये विमानाचे पंख रनवेवरून घासत जाताना दिसत आहेत. त्यानंतर विमानाला आग लागल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. मात्र अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच सर्व प्रवाशांना वाचवण्यात आलं.

आता या दुर्घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून, विमानाला झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, या अपघातापूर्वी काही तास आधी दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावरही एक मोठा विमान अपघात झाला. या अपघातात विमानाचा लँडिंग गिअर न उघडल्याने स्फोट झाला आणि हे विमान धावपट्टीवरून घसर जाऊन एका भिंतीवर आदळले. या आपघातात विमानामधील १८१ पैकी १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर केवळ २ प्रवासी बचावले.

एकापाठोपाठ एक झालेल्या या विमान अपघातांमुळे विमानांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह  निर्माण झालं आहे. तसेच भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी विमान कंपन्यांना विमानांच्या सुरक्षेबाबतचे नियम अधिक कठोर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.  

Web Title: Air Canada Flight Accident: A major plane crash like the one in South Korea was averted in Canada after a fire broke out on landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.