अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:58 IST2025-06-12T17:56:49+5:302025-06-12T17:58:16+5:30

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघातात शेकडो प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे.

Ahmedabad Plane Crash: Pakistan's first reaction to the Ahmedabad plane crash, Bilawal Bhutto said | अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर कोसळल्याची घटना आज(12 जून) दुपारी घडली. या विमानात १० केबिन क्रूसह २४२ लोक प्रवास करत होते. विमान अपघातानंतर अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, जे तुमचाही थरकाप उडेल. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या अपघातावर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची प्रतिक्रिया आली आहे.

बिलावल भुट्टो म्हणाले की, "विमान अपघाताची बातमी ऐकून खूप दुःख झाले. मी भारतीय नागरिकांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो," अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी विमान व्यक्त केला शोक 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, 'अहमदाबादमधील दुर्घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. ही घटना शब्दात व्यक्त करता येणार नाही. '

अपघाताचे दृश्य भयंकर 
ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. स्टारमर यांनी एका निवेदनात म्हटले की, 'अहमदाबादवरुन ब्रिटिश नागरिकांना घेऊन लंडनला येणाऱ्या विमानाचे दृश्य भयंकर आहे. मी प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहे. या अत्यंत दुःखद काळात माझ्या संवेदना प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.'

भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) नुसार, एअर इंडियाचे विमान एआय-171 भारतीय वेळेनुसार दुपारी 1.17 वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान अहमदाबादमधील मेघनगर आयजीपी कॉम्प्लेक्समध्ये विमान कोसळले. विमानातील इंधन टाकी पूर्ण भरलेल्या होत्या, त्यामुळे विमानाने तात्काळ पेट घेतला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात आगीचा गोळा दिसत आहे.

विमानात 242 प्रवासी
अपघातावेळी विमानात 242 लोक होते, ज्यात 12 केबिन क्रू सदस्य होते. प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.
 

Web Title: Ahmedabad Plane Crash: Pakistan's first reaction to the Ahmedabad plane crash, Bilawal Bhutto said