शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:43 IST

इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे अचानक हवाई हल्ला केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे अचानक हवाई हल्ला केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा हमास नेते अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावावर चर्चा करत होते. या अनपेक्षित कारवाईनंतर आता हा सवाल उपस्थित होत आहे की, इस्रायलचा हमासवरील पुढील हल्ला कुठे होणार? इस्रायली मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, इस्रायलचे पुढील लक्ष्य तुर्की असू शकते आणि अनेक गोष्टी याच दिशेने संकेत देत आहेत.

तुर्की बनला हमासचा 'शेवटचा अड्डा'

हमासच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत कतारमध्ये आश्रय घेतला होता. परंतु, त्यांचे अनेक वरिष्ठ नेते गेल्या अनेक वर्षांपासून तुर्कीमधील इस्तंबूलमध्ये  बसूनच आर्थिक व्यवहार आणि दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. दोहाने नेहमीच इस्रायल-हमास युद्धात मध्यस्थीची भूमिका बजावली असल्यामुळे, इस्रायल तिथे हल्ला करेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. पण आता या हल्ल्याने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, इस्रायल हमासला कुठेही शांत बसू देणार नाही. या कारवाईला अमेरिकेची मूक संमती असल्याच्याही कुजबुज होत आहे. याचा अर्थ, आता हमासला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संरक्षण मिळण्याची शक्यता फार कमी झाली आहे.

तुर्कीला नाटोची मदत मिळेल का?

तुर्की आणि हमास दोघांनाही खात्री आहे की, नाटो सदस्यत्व त्यांना हल्ल्यापासून वाचवेल. पण, परिस्थिती इतकी सोपी नाही. नाटो सामूहिक संरक्षणाच्या तत्त्वावर काम करते, ज्यानुसार कोणत्याही एका सदस्यावर झालेला हल्ला हा सर्व सदस्यांवरील हल्ला मानला जातो. पण हा नियम आपोआप लागू होत नाही; त्यासाठी सर्व देशांची संमती आवश्यक असते.

येथेच तुर्कीची अडचण वाढते. स्वीडन आणि फिनलंडसारखे नाटोचे नवीन सदस्य तुर्कीवर नाराज आहेत, कारण त्यांना सदस्यत्व देताना तुर्कीने कुर्द कार्यकर्त्यांना दाबून ठेवण्याच्या अटी घातल्या होत्या. दुसरीकडे, अमेरिकाही तुर्कीच्या दुहेरी भूमिकेवर आणि हमाससोबतच्या जवळीकीवर बारीक लक्ष ठेवून आहे. यामुळे नाटोचा हा हुकुमी एक्काही तुर्कीच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Israelइस्रायलGaza Attackगाझा अटॅक