भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:47 IST2025-10-24T14:46:22+5:302025-10-24T14:47:33+5:30

४८० किलोमीटर लांबीची कुनार नदी पाकिस्तान सीमेजवळ अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतांमधील ब्रोघिल खिंडीजवळ उगम पावते. ती कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून दक्षिणेकडे वाहते.

After India, another country will block Pakistan's water, preparations are underway to build a dam on the Kunar River | भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू

भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू

भारताने 'ऑपरेशन सिंदूर' वेळी पाकिस्तानसोबतचा 'सिंधू जल करार' रद्द केला. यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी बंद करण्यात आले. पाकिस्तानच्या अनेक भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे बांधण्याची तयारी करत आहे.

एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?

अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तालिबानचा सर्वोच्च नेता मौलवी हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे आदेश दिले आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या युद्धानंतर हे पाऊल उचलले जात आहे, पाकिस्तानसोबत पाणी वाटप करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर अफगाणिस्तानचा हा निर्णय आला आहे. 

सर्वोच्च नेते अखुंदजादा यांनी मंत्रालयाला कुनार नदीवर लवकरच धरण बांधण्याचे आणि देशांतर्गत कंपन्यांशी करार करण्याचे निर्देश दिले आहेत. उप माहिती मंत्री मुहाजेर फराही यांनी गुरुवारी एक्स वर ही माहिती शेअर केली. युसुफझाई यांच्या मते, सर्वोच्च नेते यांनी मंत्रालयाला परदेशी कंपन्यांची वाट पाहण्याऐवजी देशांतर्गत अफगाण कंपन्यांशी करार करण्याचे आदेश दिले.

कुनार नदी ४८० किलोमीटर लांब 

४८० किलोमीटर लांबीची कुनार नदी पाकिस्तान सीमेजवळ अफगाणिस्तानातील हिंदू कुश पर्वतरांगांमधील ब्रोघिल खिंडीजवळ उगम पावते. ती कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून दक्षिणेकडे वाहते. नंतर ती पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये प्रवेश करते, तिथे ती जलालाबाद शहराजवळ काबूल नदीला मिळते. कुनार नदीला पाकिस्तानमध्ये चित्रल नदी म्हणून ओळखले जाते. ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठी आणि सर्वात मुबलक सीमापार नदी आहे. काबूल नदी अट्टोकजवळ सिंधू नदीला मिळते आणि पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सिंचन आणि इतर पाण्याच्या गरजांसाठी महत्त्वाची आहे.

Web Title : भारत के बाद अब अफ़ग़ानिस्तान भी पाकिस्तान का पानी रोकेगा, कुनार नदी पर बनेगा बांध

Web Summary : भारत द्वारा पानी रोकने के बाद, तालिबान शासित अफ़ग़ानिस्तान कुनार नदी पर बांध बनाकर पाकिस्तान को पानी की आपूर्ति सीमित करने की योजना बना रहा है। तालिबान नेता ने घरेलू कंपनियों को प्राथमिकता देते हुए तत्काल कार्रवाई का आदेश दिया है, जिससे काबुल नदी प्रणाली प्रभावित होगी।

Web Title : Afghanistan to Block Pakistan's Water Supply by Building Kunar Dam

Web Summary : Following India's water restrictions, Taliban-led Afghanistan plans to build a dam on the Kunar River, potentially limiting Pakistan's water supply. The Taliban leader has ordered swift action, prioritizing domestic companies for the project, impacting the vital Kabul River system.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.