होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:23 IST2026-04-04T15:22:58+5:302026-04-04T15:23:39+5:30

इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे जागतिक इंधन आणि अन्न पुरवठा धोक्यात!

After Hormuz, Iran now has its eyes on 'Bab al-Mandeb'? A tweet creates a stir; What will be the consequences? | होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?

होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आता जागतिक समुद्री व्यापारासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. इराणने 'स्ट्रॅट ऑफ होर्मुझ'नंतर आता 'बाब अल-मंदेब' या महत्त्वाच्या सागरी मार्गावर आपली रणनीतिक पकड मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठा आणि अन्नसुरक्षेवर गंभीर संकट ओढवू शकते.  

'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मध्ये आधीच नाकेबंदी करून जगाला वेठीस धरणाऱ्या इराणने आता आपला मोर्चा दुसऱ्या महत्त्वाच्या समुद्री मार्गाकडे वळवला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिलेल्या एका इशाऱ्यामुळे जागतिक व्यापार क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले असून, आता 'बाब अल-मंदेब' हा मार्ग इराणच्या निशाण्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

एका ट्विटने वाढवलं जगाचं टेन्शन!

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही खोचक प्रश्न उपस्थित करत जगताला विचार करायला भाग पाडले आहे. त्यांनी विचारले की, "जगातील तेल, एलएनजी, गहू, तांदूळ आणि खतांच्या शिपमेंटचा किती हिस्सा बाब अल-मंदेबमधून जातो? कोणते देश आणि कंपन्या या मार्गावर सर्वाधिक अवलंबून आहेत?" एका अर्थपूर्ण इमोजीसह विचारलेले हे प्रश्न म्हणजे जागतिक समुदायासाठी दिलेली उघड चेतावणी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

का महत्त्वाचा आहे 'बाब अल-मंदेब' मार्ग?

हा समुद्री मार्ग लाल समुद्र आणि अदनच्या आखाताला जोडतो. स्वेज कालव्याद्वारे युरोप आणि आशियामध्ये होणाऱ्या व्यापाराचा हा मुख्य दुवा आहे. जर इराणने किंवा त्यांच्या समर्थित गटांनी या मार्गावर अडथळे निर्माण केले, तर इंधनाचे दर गगनाला भिडतील. कारण, कच्च्या तेलाचा मोठा पुरवठा याच मार्गाने होतो. याशिवाय, गहू आणि तांदळाची जागतिक रसद विस्कळीत होईल. मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने सर्वच वस्तू महाग होतील.

होर्मुज ते बाब अल-मंदेब: इराणची 'घेराबंदी'

इराणने आधीच होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये शत्रू जहाजांच्या हालचालींवर निर्बंध लादले आहेत. आता बाब अल-मंदेबवर नियंत्रण मिळवण्याचे संकेत देऊन इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या चोकपॉईंट्सवर आपली पकड मजबूत करण्याची योजना आखली आहे. या हालचालीमुळे अमेरिका आणि युरोपीय देशांच्या व्यापाराला मोठा तडाखा बसू शकतो.

सध्या इराणने कोणत्याही अधिकृत लष्करी कारवाईची घोषणा केलेली नाही. मात्र, अशा प्रकारची वक्तव्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात वादळ निर्माण करणारी ठरत आहेत. जर हा मार्ग बंद झाला, तर केवळ तेलच नाही, तर खते आणि अन्नधान्यासाठी जगाला वणवण फिरावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title : होर्मुज के बाद ईरान की नजर बाब-अल-मंडेब पर; वैश्विक व्यापार तनाव बढ़ा।

Web Summary : होर्मुज जलसंधि के बाद, ईरान बाब-अल-मंडेब पर नियंत्रण के संकेत दे रहा है, जिससे वैश्विक व्यापार खतरे में है। ईरानी अधिकारी के एक ट्वीट ने तेल, एलएनजी और खाद्य आपूर्ति में व्यवधान की आशंका जताई है, जिससे ऊर्जा सुरक्षा और वैश्विक अर्थव्यवस्थाएं प्रभावित हो सकती हैं। इससे भू-राजनीतिक तनाव बढ़ गया है।

Web Title : Iran eyes Bab-el-Mandeb after Hormuz; Global trade tensions rise.

Web Summary : After the Strait of Hormuz, Iran is signaling control over Bab-el-Mandeb, threatening global trade. A tweet from an Iranian official raised concerns about disruptions to oil, LNG, and food supplies, potentially impacting energy security and global economies. This intensifies geopolitical tensions.