पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:25 IST2025-06-12T11:23:34+5:302025-06-12T11:25:36+5:30

ही ड्रोन आर्मी कराची असो रावळपिंडी असो अथवा इस्लामाबाद, कुठेही हल्ला चढवू शकेल. यामुळे पाकिस्तानला अडचणींचा सामना करावा लागू शकतो...

afghanistan taliban enemy of Pakistan is building an army of suicide drones; whether it is Rawalpindi, Islamabad or Karachi, it will be reduced to dust in a moment | पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!

पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!

पाकिस्तानच्या एका शत्रू देशाने एक मोठी सुसाइड ड्रोन आर्मीच तयार केली आहे. कामिकाझे (आत्मघातकी) ड्रोन एअर फोर्स तयार करण्याबरोबरच त्यात काही हेलिकॉप्टरचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढणार हे नक्की. ही ड्रोन आर्मी कराची असो रावळपिंडी असो अथवा इस्लामाबाद, कुठेही हल्ला चढवू शकेल. हे काम केले आहे अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानने. यामुळे पाकिस्तानला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

डेली मेलच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानने आपली नवी एअर फोर्स तयार केली आहे. तालिबानने 'ड्रोन एअर फोर्स' तयार करण्याची घोषणा केली आहे. ते सध्या ड्रोन एअर फोर्सची चाचणी घेत आहेत. यासाठी ते माजी ब्रिटिश एसएएस बेस वापरत आहे. तालिबानची ही आत्मघातकी ड्रोन फौज क्षणार्धात कोणत्याही शत्रू देशात हाहाकार माजू शकेल. सध्या याची चाचणी सुरू आहे.

ड्रोन तयार करण्यासाठी इंजिनिअर्सची भरती करणार तालिबान -
संबंधित वृत्तानुसार, तालिबान मोठ्या प्रमाणात ड्रोन बनवण्याचे काम सुरू करणार आहे. यासाठी ते लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची भरती करणार आहेत. यात एका अशा इंजिनिअरचा समावेश आहे, ज्याच्यावर ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे. तालिबान ड्रोन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती सुरू करणार आहे. हे पाश्चात्य देशांच्या सुरक्षा संस्थांसाठीही धोक्याची घंटा आहे.


 

Web Title: afghanistan taliban enemy of Pakistan is building an army of suicide drones; whether it is Rawalpindi, Islamabad or Karachi, it will be reduced to dust in a moment