Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळाबाहेर भीषण परिस्थिती; गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 14:40 IST2021-08-22T14:33:12+5:302021-08-22T14:40:03+5:30
Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे.

Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळाबाहेर भीषण परिस्थिती; गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू
तालिबान्यांनीअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. अशातच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. काबुल विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली.
काबुल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. "अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे" असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-17 विमान आज सकाळी काबुलहून 168 जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायुसेनेकडून घेतली जात आहे. यात अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे.
BREAKING: The British military says seven Afghan civilians have been killed in the crowds near Kabul’s international airport amid the chaos of those fleeing the Taliban takeover of the country. https://t.co/UgQsleH28t
— The Associated Press (@AP) August 22, 2021
हाहाकार! काबुल विमानतळाच्या कुंपणावरून चिमुकल्यांना फेकताहेत महिला; जीव वाचवण्यासाठी धावपळ
तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. अशातच काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घालण्यात आलं आहे. परंतु देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकताना दिसत आहेत. अशातच काही मुलं या कुंपणांमध्येच अडकून पडल्याचा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. काबूल विमानतळावर हताश नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक महिला आपल्या मुलांना घेऊन विमानतळावर धावताना दिसत आहेत. अफगाणी महिला आपली मुलं रेंजर तारांवरुन पलीकडे फेकत होत्या. हे दृश्य खरोखरच भयानक होतं. सैनिकांनी आपल्या मुलांना घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र यातील काही मुलं तारांमध्येच अडकून पडली असल्याचं म्हटलं आहे.
सैनिकांकडे सोपवलेलं 'ते' बाळ आता नेमकं आहे तरी कुठे?; अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा#Afganistan#AfghanTaliban#Taliban#TalibanTerror#AfghanistanCrisishttps://t.co/9NDrzLt4cx
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2021
परिस्थिती गंभीर! Video व्हायरल झालेल्या 'त्या' बाळाचं नेमकं काय झालं?; जाणून घ्या, 'सत्य'
अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. येथे ब्रिटीश आणि अमेरिकन सैनिकही भावूक झाले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अशी अनेक दृश्य पाहून सैनिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. असाच एक काळजात चर्र करणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. आपल्या लेकाचा जीव वाचवण्यासाठी हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सैनिकाकडे सोपवलेल्या बाळाचं नेमकं नंतर काय झालं? अशा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर आता अमेरिकन सैन्याने ते बाळ पुन्हा त्याच्या वडीलांकडे सोपवल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओशी संबंधित माहिती दिली आहे. "काबूल विमानतळावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्याने एका अफगाणी बाळाला तारेच्या कुंपणावरुन घेतले होते. आता त्या बाळाला त्याच्या वडिलांकडे पुन्हा सोपवण्यात आले असून ते विमानतळावर सुरक्षित आहे" अशी माहिती अधिकाऱ्यांनी आता दिली आहे.
अफगाणी स्त्रीची वेदनादायी व्यथा; अवघ्या 14 व्या वर्षी तालिबानी मुलासोबत लग्न अन्...#Afganistan#AfghanTaliban#Taliban#TalibanTerror#AfghanistanCrisishttps://t.co/LYDM5i9BAu
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2021
परिस्थिती गंभीर! ...अन् लहान मुलं तारेच्या कुंपणातच अडकून पडली; 'हे' दृश्य पाहून सैनिकही भावूक #Afganistan#AfghanTaliban#Taliban#TalibanTerror#AfghanistanCrisishttps://t.co/jCdifkoLWG
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2021