शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

Afghanistan Taliban Crisis: तालिबानने 'या' ४ कारणांमुळे फक्त ७२ तासांत अफगाणिस्तान केलं काबीज; जाणून घ्या शेवटचा थरार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 16:02 IST

अफगाणिस्तान विरुद्ध तालिबान युद्धात शेवटचे तीन दिवस निर्णायक ठरले जेव्हा तालिबानने बाराच्या वर शहरं आपल्या ताब्यात घेतली.

काबुल: तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबुलमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण अफगाणिस्तानवरतालिबानचा ताबा आहे. अफगाणी नागरिकांना तालिबानी शासनाचा आधीचा अनुभव असल्यामुळे त्यांना अफगाणिस्तानमध्ये राहायचं नाही. त्यांना कुठल्याही परिस्थितीत देश सोडायचा आहे. यासाठी विमान हा एकमात्र पर्याय आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक विमानतळावर येऊन कोणत्याही फ्लाइटमध्ये चढून देशातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत. 

अफगाणिस्तान विरुद्ध तालिबान युद्धात शेवटचे तीन दिवस निर्णायक ठरले जेव्हा तालिबानने बाराच्या वर शहरं आपल्या ताब्यात घेतली. तालिबानचं सैन्य फक्त ६० हजारांचं आणि अफगाण सरकारकडे होते ३ लाखांहून जास्त सैनिक. तालिबानकडे होती लुटलेली, जुनी शस्त्रं. तर अफगाण फौजांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती.  पण असं असून फक्त ७२ तासांमध्ये तालिबानने एकेक करत डझनभर शहरांवर ताबा मिळवत काबूल गाठलं. मात्र बीबीसी वृत्तनाहिनीनूसार यामागे पुढील ४ कारणं महत्वाची आहेत.

१. अफगाण सैन्यात राष्ट्रीय भावनेचा अभाव-

अफगाण राष्ट्रीय सैन्य कधी धड अस्तित्वातच येऊ शकलं नाही. अमेरिकेने त्यांच्या उभारणी आणि पगारासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले, पण तो पगार सैनिकांपर्यंत पोहोचण्यात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. अनेक सैनिक अस्तित्वातच नव्हते - ते केवळ कागदावर होते आणि त्यांचा पगार अधिकारी खात होते. अफगाण सैन्यात नेमके जवान किती आहेत, हा आकडा अफगाण सरकारही शेवटपर्यंत देऊ शकलं नाही. विविध टोळ्यांमधून आलेल्या अनेक सैनिकांमध्ये राष्ट्रीय भावनेचा अभाव दिसला. त्यामुळे ते शत्रू दिसताच पळ काढू लागले.

२. तालिबानकडे स्थानिक भूगोलाची बारीक माहिती-

अफगाण सैन्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि विमानं होती खरी, पण त्यांचा रखरखाव करणं जिकिरीचं ठरलं. तसंच, तालिबानने त्यांच्या पायलट्सना हेरून ठार मारलं. युद्ध सोडून पळालेल्या अफगाण सैनिकांची अमेरिकन शस्त्रास्त्रं तालिबानसाठी लढणाऱ्यांना सहज मिळाली. तालिबानकडे आधीपासूनची सोव्हिएतच्या आक्रमणावेळची शस्त्रं होतीच. तालिबानकडे स्थानिक भूगोलाची बारीक माहिती होती. अनेक स्थानिकांची मदतही होती. त्यामुळे शस्त्रं थोडी कमी असली तरी ती उणीव या अचून माहितीने भरून काढली.

३. तालिबानला अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळतो महसूल-

तालिबानला अंमली पदार्थांच्या तस्करीतून मोठा महसूल मिळतो. त्यांनी एक-एक सीमा बंद करत काबूलमधल्या सरकारच्या आर्थिक नाड्या आवळल्या. आधीपासूनच ते सरकार तंगीत दिवस काढत होतं. अमेरिकेकडून येणारी मदतही अटत होती. त्यामुळे अश्रफ घनी सरकारच्या तिजोरीत ऐन युद्धाच्या वेळी खडखडाट होता.

४. सैनिकांमध्ये लढण्याचा विश्वास निर्माण करण्यात सरकार अपयशी-

अफगाणिस्तानात अमेरिकेनं लोकशाही सरकार स्थापन केलं असलं तरी या सरकारविषयी स्थानिक लोकांमध्ये पाश्चिमात्य देशांचं बाहुलं सरकार अशीच प्रतिमा होती. त्यामुळे सैन्याचा आणि लोकांचाही सरकारवर विश्वास नव्हता. त्यातच काबूलपर्यंत तालिबानचं सैन्य आल्यावर राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनीच काढता पाय घेतला. त्यामुळे राष्ट्रीय सैन्य निर्नायकी अवस्थेत होतं. सैन्याला प्रतिकार करायचा झाला तरी निश्चित धोरण लागतं. सैनिकांमध्ये लढण्याचा विश्वास निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं. त्यामुळे सैन्याने अनेक ठिकाणी प्रतिकारच केला नाही.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी एक रणनीती आखून ते वाटचाल करत आहेत. तालिबानी संघटनेमध्ये आणि त्या संघटनेच्या बंडखोरांमध्ये मात्र बराच बदल झाल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. हा बदल तालिबानकडे मोठ्या प्रमाणावर आलेल्या संपत्तीमुळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका माहितीनुसार, अमेरिकेने सोव्हिएत संघाला शीतयुद्धात मात देण्यासाठीच तालिबानच्या स्थापनेला छुपा पाठिंबा दिला. एवढेच नव्हे, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि पैसा पाकिस्तानच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम अमेरिकेने केल्याचे सांगितले जाते.

बदला घ्यायचा नाही-

तालिबानी प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. सरकार आणि लष्करात सेवा देणाऱ्यांना माफ करण्यात येईल. नागरिकांनी घाबरू नये. कोणीही भीतीने देश सोडून जाऊ नये, असे आवाहनही केले.  मात्र, नागरिकांनी भीतीपोटी काबुल सोडण्यास सुरुवात केली असून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची  कोंडी झाली आहे.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका