Afghanistan Crisis: अफागाणिस्तानची गुलामीतून मुक्तता; तालिबान्यांच्या समर्थनार्थ इम्रान खान यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:26 IST2021-08-16T19:25:35+5:302021-08-16T19:26:29+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान्यांची साथ देणार असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं आहे.

Afghanistan Crisis: अफागाणिस्तानची गुलामीतून मुक्तता; तालिबान्यांच्या समर्थनार्थ इम्रान खान यांचं मोठं विधान
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबान्यांची साथ देणार असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं आहे. त्यांनी अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी मिळवलेल्या नियंत्रणाचं समर्थन केलं आहे. अफगाणिस्तानची आज गुलामीच्या साखळदंडातून मुक्तता झाली आहे, असंही इम्रान खान म्हणाले आहेत.
अफगाणिस्तानात आता पूर्णपणे तालिबान्यांनी कब्जा केला आहे. अफगाणिस्तान सरकारच्या नियंत्रणात असलेल्या एकमेव काबुल राजधानीवरही तालिबान्यांनी रविवारी कब्जा केला. याआधीच देशाचे राष्ट्रपती अशरफ गनी यांना आपल्या सहकाऱ्यांसह देश सोडून निघून जावं लागलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोमवारी सिंगल नॅशनल करिक्युलमच्या (एसएनसी) पहिल्या पाठ्यक्रमाच्या लॉन्चिंग कार्यक्रमात बोलत होते. समांतर शिक्षण प्रणालीमुळेच पाकिस्तानात इंग्रजी शाळा आल्या आणि देशात इतर देशांची संस्कृती जन्माला आली, असं इम्रान खान म्हणाले. त्यांच्या भाषणात यावेळी पश्चिमेकडील देशांबाबतचा रोष स्पष्ट दिसून आला. ते म्हणाले की, जेव्हा तुम्ही एखाद्या संस्कृतीचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही त्यास श्रेष्ठ समजता आणि तुम्ही त्याचे गुलाम होऊन जाता. हा एकाप्रकारे मानसिक गुलामीचा प्रकार आहे की जो वास्तविक गुलामीपेक्षाही भयंकर आहे.