Afghanistan Taliban: अफगाणिस्तानात तालिबानच्या सरकार स्थापनेची घोषणा; मुल्ला हसन अखुंद नवे पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:46 PM2021-09-07T21:46:35+5:302021-09-07T21:48:01+5:30

गैर तालिबानींना अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये सामावून घ्या अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. परंतु ती मागणी पूर्ण झाली नाही.

Afghanistan Taliban: Announcement of government in Afghanistan; Mulla Hassan is the new PM | Afghanistan Taliban: अफगाणिस्तानात तालिबानच्या सरकार स्थापनेची घोषणा; मुल्ला हसन अखुंद नवे पंतप्रधान

Afghanistan Taliban: अफगाणिस्तानात तालिबानच्या सरकार स्थापनेची घोषणा; मुल्ला हसन अखुंद नवे पंतप्रधान

Next

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्येतालिबानी सरकारची स्थापना झाली आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद(Mullah Hassan Akhund) अफगाणिस्तानमधीलतालिबान सरकारचे पंतप्रधान असतील. अखेर सरकारमध्ये सिराज हक्कानीला गृहमंत्री बनवलं आहे तर मुल्ला याकूबला देशाचं संरक्षण मंत्री बनवण्यात आलं आहे. मुल्लाह हसन अखुंद कॅबिनेटचे हेड असतील आणि तालिबानी सरकारचे पंतप्रधानपद सांभाळतील.

असं असेल तालिबानी मंत्रिमंडळ

अब्दुल गनी बरादर उपपंतप्रधान असतील. खैरउल्लाह खैरख्वा हे माहिती प्रसारण मंत्री असतील. अब्दुल हकीम याच्याकडे कायदे मंत्रालय असेल. शेर अब्बास स्टानिकजई परराष्ट्र राज्य मंत्री असतील. तर जबिउल्लाह मुजाहिदला माहिती प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. तालिबान सरकारमध्ये त्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे जे २० वर्षापासून अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तानविरोधात मोर्चा उघडला होता. गैर तालिबानींना अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये सामावून घ्या अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. परंतु ती मागणी पूर्ण झाली नाही.

मागील काही महिन्यात अफगाणिस्तानचं चित्र बदललं

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती खूप वेगाने बदलत आहे. अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा मिळवला. दुसरीकडे ३१ ऑगस्ट मुदत संपण्यापूर्वीच अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानची भूमी सोडून मायदेशी परतलं. अफगाणिस्तानातील चित्र पाहून तत्कालीन राष्ट्रपती अशरफ घनी अफगाणिस्तान सोडून पळून गेले. तालिबानी सरकारच्या स्थापनेपूर्वी तालिबानी एक सर्वसमावेशक सरकार बनवेल अशी आशा होती. तालिबानने स्वत: अनेकदा हा २० वर्षापूर्वीचा तालिबान नाही असं म्हटलं होतं. ते लोकांना अधिकार आणि सन्मान देतील असंही सांगितले आहे. तालिबान खूप दिवसांपासून सरकार बनवण्याच्या हालचाली करत होतं. दोन-तीनदा घोषणा टाळली. तालिबानी आणि हक्कानी नेटवर्क यांच्यातील सत्तासंघर्षामुळे काही विवाद सुरु होते. परंतु तालिबाननं आता सरकारची स्थापना केली आहे.

मुल्ला बरादरचेच पंख छाटले

मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mullah Mohammad Hasan Akhund) हा राष्ट्राध्यक्ष पदासाठी अर्ज करणार असल्याचे तालिबानच्या तीन प्रमुख नेत्यांनी स्पष्ट केले आहे. हसन हा तालिबानची सर्वात शक्तीशाली विंग रहबारी शूराचा प्रमुख आहे. जो गेल्या दीड महिन्यांत कुठेही प्रकाशझोतात आला नव्हता. हसन हा तालिबानचे जन्मस्थान कंदाहरचा आहे. दहशतवादी आंदोलनाच्या संस्थापकांपैकी एक आहे. त्याने रहबारी शूराचे 20 वर्षे नेतृत्व केले आहे.

Web Title: Afghanistan Taliban: Announcement of government in Afghanistan; Mulla Hassan is the new PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.