पाकिस्तानात प्रचंड गोंधळ! पेशावरपासून काबूलपर्यंत स्फोटांचे आवाज; ५५ सैनिक ठार केल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 23:38 IST2026-02-27T23:31:56+5:302026-02-27T23:38:42+5:30
Afghanistan Pakistan War: तालिबानने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवरून शस्त्रे हस्तगत केल्याचाही दावा

पाकिस्तानात प्रचंड गोंधळ! पेशावरपासून काबूलपर्यंत स्फोटांचे आवाज; ५५ सैनिक ठार केल्याचा दावा
Afghanistan Pakistan War: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेल्या लष्करी तणावाने आता हळूहळू युद्धाचे रूप प्राप्त केले आहे. दिवसभरात पाकिस्तानकडून अफगाणिस्तावर एअरस्ट्राईक करण्यात आल्यानंतर, रात्री उशिरा अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. त्यांनी ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. अफगाण सरकारने २३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आपल्याकडे असल्याचेही म्हटले आहे. डुरंड सीमेवरून सुरू असलेल्या संघर्षात अफगाण सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आणि १९ चौक्यादेखील ताब्यात घेतल्या आहेत.
🚨 BIG BREAKING NEWS💥
— Afghanistan Defense (@AFGDefense) February 27, 2026
The Ministry of Defense of Afghanistan has released this video & stated that it has carried out such attacks on centers of the Pakistani military regime.
It is said that the Islamic Emirate has obtained advanced equipment. pic.twitter.com/ChdooxY6Xv
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
पाकिस्तानी लष्करी चौक्यांवरून शस्त्रे हस्तगत
पाकिस्तानी हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, तालिबानी सैन्याने सीमेवरील पाकिस्तानी लष्करी स्थानांवर हल्ला केला. लष्करी सैनिकांनी पाकिस्तानी सीमेत घुसून जलद हल्ले केले. अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख फसिहुद्दीन फितरत यांनी आघाडीवर पोहोचून सैन्याच्या कारवायांचा आढावा घेतला. तालिबानी सैन्याने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे हस्तगत केली. त्यांनी पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर भयंकर हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या सैनिकांना पळून जावे लागले. अफगाण सैनिकांनी पाकिस्तानी चौक्या आणि वाहनांना आग लावली आणि नष्ट केले. शिवाय, अफगाणिस्तानने पाकिस्तानातील पेशावरमध्ये ड्रोन हल्ला केला, ज्यामुळे बाजारपेठेत घबराट पसरली.
🚨Missile strikes have begun on Pakistani military installations.
— Afghanistan Defense (@AFGDefense) February 27, 2026
Sources in Khost report that Afghan forces have launched extensive missile attacks on Pakistani military facilities beyond the hypothetical line.
It is said that Afghan forces used BM-21 rockets in these attacks. pic.twitter.com/Pkwf4LAot5
पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान पाडल्याचा दावा
या हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. इस्लामाबादमधील पाकिस्तानी लष्करी चौक्यांवरही हल्ल्यांचे वृत्त आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनीही अबोटाबाद, स्वाबी आणि नौशेरा येथे हल्ले झाल्याचे वृत्त दिले आहे, परंतु ते हाणून पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, अफगाण सैन्याने तोरखम सीमेवरील खैबर येथील पाकिस्तानी लष्करी चौकीवर हल्ला करून ताबा मिळवला. तोरखम येथे दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या भीषण चकमकीत अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले. अफगाणिस्तानच्या सैन्याने एका पाकिस्तानी सैनिकालाही ताब्यात घेतले. तालिबानने पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. जळत्या विमानाचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे, ज्याला अफगाण मीडियाने पाकिस्तानी एफ-१६ लढाऊ विमान म्हणून सांगितले आहे. मात्र, पाकिस्तानकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
🚨 BIG BREAKING NEWS💥
This is a Pakistani military F-16, American-made, that Afghan defensive forces have shot down. pic.twitter.com/7qBAjv89rk— Afghanistan Defense (@AFGDefense) February 27, 2026
आशिक खान चौधरी यांच्या निधनाची बातमी
अफगाणिस्तानातील अबोटाबाद हल्ल्यात पाकिस्तानी जनरल आशिक खान चौधरी ठार झाल्याचे वृत्त आहे. जनरल आशिक खान हे असीम मुनीर यांचे वरिष्ठ सल्लागार होते. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या अबोटाबाद लष्करी तळावर ड्रोन हल्ला केला. रशियन वृत्तसंस्था TASS ने अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्धावर एक प्रमुख बातमी दिली. TASS ने म्हटले आहे की अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या काकुल येथील अणुसुत्रावर हल्ला केला. काकुल अणुसुत्र खैबर पख्तुनख्वा येथील अबोटाबादजवळ आहे. 'लोकमत'ने या हल्ल्याची पुष्टी केलेली नाही.