ब्रिटिश अधिकाऱ्याच्या निर्णयाने ठिणगी पेटली; 132 वर्षे जुना पाक-अफगाणिस्तान वाद, अशी झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:20 IST2026-02-27T16:19:06+5:302026-02-27T16:20:06+5:30

Afghanistan-Pakistan Conflict: जाणून घ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षाचा इतिहास.

Afghanistan-Pakistan Conflict: spark was ignited by the line drawn by the British; This is how the 132-year-old Pakistan-Afghanistan dispute began | ब्रिटिश अधिकाऱ्याच्या निर्णयाने ठिणगी पेटली; 132 वर्षे जुना पाक-अफगाणिस्तान वाद, अशी झाली सुरुवात

ब्रिटिश अधिकाऱ्याच्या निर्णयाने ठिणगी पेटली; 132 वर्षे जुना पाक-अफगाणिस्तान वाद, अशी झाली सुरुवात

Afghanistan-Pakistan Conflict:पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेला तणाव अखेर उघड युद्धात परिवर्तित झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून दोन्ही देशांमध्ये भीषण लष्करी संघर्षाला सुरुवात झाली. पाकिस्तानच्या सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल, कंधार आणि पक्तिया यांसह अनेक भागांमध्ये हवाई हल्ले केले. त्यानंतर अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानने पाकिस्तानच्या सीमा चौक्यांवर जोरदार प्रत्युत्तरात्मक हल्ले केले.

पाकिस्तानची आक्रमक भूमिका

या कारवाईनंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले, आमच्या संयमाचा अंत झाला आहे. आता आमच्यात आणि तुमच्यात थेट युद्ध आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही स्पष्ट केले की, देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि शांततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

तालिबानचा पलटवार

तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या विधानांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की, 26 फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांत महिला आणि मुलांसह नागरिकांचा मृत्यू झाला. आम्ही प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैनिकांना मागे हटवले आहे.

‘ऑपरेशन गजब-लिल-हक’

पाकिस्तानने या हवाई कारवाईला ‘ऑपरेशन गजब-लिल-हक’ असे नाव दिले आहे. पाकिस्तानचा दावा आहे की, या मोहिमेत 133 अफगाण तालिबान लढवय्ये ठार झाले. ‘गजब-लिल-हक’ या अरबी शब्दाचा अर्थ “सत्य किंवा न्यायासाठीचा प्रकोप” असा होतो. दरम्यान, अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तरात 50 हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे.

चिंता वाढली...

या संघर्षामुळे कतारच्या मध्यस्थीने झालेला युद्धविराम धोक्यात आला असून, आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे. दक्षिण आशियातील स्थैर्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ड्युरंड रेषा: शंभर वर्षांचा सीमावाद

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ड्युरंड रेषा. 1893 मध्ये ब्रिटिश भारताचे परराष्ट्र सचिव सर मॉर्टिमर ड्युरंड आणि अफगाण अमीर अब्दुल रहमान खान यांच्यात झालेल्या करारानुसार 2,640 किमी लांबीची ही सीमा आखण्यात आली. अफगाणिस्तान आजही ही रेषा मान्य करत नाही. त्यांच्या मते, या रेषेमुळे पश्तून आणि बलुच जमाती दोन भागांत विभागल्या गेल्या. पाकिस्तानने 2017 मध्ये या संपूर्ण सीमेवर कुंपण उभारले, ज्याला तालिबानने 2021 मध्ये सत्तेत येताच विरोध सुरू केला.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान...

संघर्षाचे दुसरे मोठे कारण म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP). 2001 नंतर अमेरिकेच्या ‘वॉर ऑन टेरर’ दरम्यान अनेक दहशतवादी पाकिस्तानच्या आदिवासी भागांत लपले. 2007 मध्ये लाल मशिदीतील कारवाईनंतर TTP ची स्थापना झाली आणि त्यांनी पाकिस्तानविरोधात सशस्त्र संघर्ष सुरू केला. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाण तालिबान सरकार TTP ला आश्रय देत आहे.

FATA आणि संघर्षाची पार्श्वभूमी

पाकिस्तानच्या सीमेलगत असलेला FATA (फेडरली अ‍ॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाज) भाग अनेक दशकांपर्यंत बफर झोन म्हणून कार्यरत होता. 2018 मध्ये हा भाग खैबर पख्तूनख्वा प्रांतात विलीन करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा थेट समोरासमोर आली आणि संघर्ष अधिक तीव्र झाला. या सर्व कारणांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आज थेट युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. हा संघर्ष पुढे किती वाढतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : डूरंड रेखा विवाद ने पाकिस्तान-अफगानिस्तान संघर्ष को भड़काया: एक सदी पुरानी सीमा समस्या।

Web Summary : हवाई हमलों और जवाबी हमलों के बाद पाकिस्तान और अफगानिस्तान भयंकर संघर्ष में लगे हुए हैं। ऐतिहासिक सीमा विवाद डूरंड रेखा और आतंकवादियों को शरण देने के आरोपों से क्षेत्रीय स्थिरता और अंतरराष्ट्रीय चिंता को खतरा है।

Web Title : Durand Line Dispute Sparks Pakistan-Afghanistan Conflict: A Century-Old Border Issue.

Web Summary : Pakistan and Afghanistan are engaged in fierce conflict following airstrikes and retaliatory attacks. The Durand Line, a historic border dispute, and accusations of harboring terrorists fuel the escalating tensions, threatening regional stability and international concern.