अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:50 IST2025-05-10T16:43:06+5:302025-05-10T16:50:13+5:30
India Pakistan Afghanistan: खोटे दावे करत पाकिस्तानकडून अफगाणिस्तानालाही भारताविरोधात भडकावण्याचे प्रयत्न केले गेले. पण, अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा टरटरा फाडला.

अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
Afghan Rejects Pakistan claims about Indian missile strikes: मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानने आता रडीचा डाव सुरू केला आहे. खोटा दावा करत पाकिस्तानने अफगाणिस्तानला भारताविरोधात फितवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा हा प्रयत्नही अपयशी ठरला. भारताने विरोधात कान भरू पाहणाऱ्या पाकिस्तानच्या खोटे पणाचा बुरखा अफगाणिस्थानच्या संरक्षण मंत्रालयाने टरटरा फाडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानी लष्कराने असा दाव केला होता की, भारताने अफगाणिस्तानवर मिसाईल हल्ला केला आहे. त्यांचा हेतू संपूर्ण प्रदेशाला अस्थिर करण्याचा आहे. अफगाणिस्तानात पडलेल्या भारतीय मिसाईलचे पुरावे असल्याचा पोकळ दावाही पाकच्या हवाई दलाने केला होता. पाकिस्तानातील मंत्री आणि नेत्यांनीही या खोट्या दाव्याला बढावा दिला होता.
अफगाणिस्ताने पाकिस्तानचा खोटेपणा आणला चव्हाट्यावर
पाकिस्तानने केलेला दावा अफगाणिस्ताने फेटाळून लावला. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह खावरिजमी यांनी हुरियत रेडिओशी बोलताना हे सांगितले. भारताने अफगाणिस्तानात मिसाईल हल्ला केल्याचा दाव्याला कोणताही आधार नाही. हे पूर्णपणे खोट आहे, असे ते म्हणाले.
भारतानेही फेटाळून लावला दावा
अफगाणिस्तानकडून याबद्दल उत्तर येण्यापूर्वी भारतानेही पाकिस्तानचा हा खोटा दावा फेटाळून लावला होता. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले.
वाचा >>...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
अफगाणिस्तानच्या जनतेला चांगलं माहिती आहे की, त्यांचा खरा मित्र कोण आहे आणि त्यांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन कोणाकडून केले जात आहे. पाकिस्तानकडून दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.
पाकिस्तानकडून फेक न्यूजचा प्रसार
पाकिस्तानी ड्रोन, मिसाईल भारतीय लष्कराने हाणून पाडल्या. त्याचबरोबर भारताने ताबडतोब हल्ला केल्यानंतर पाकिस्तानकडून अफवा पसरवल्या जात आहे. भारताचे लढाऊ विमाने पाडल्याच्या, राफेल विमान पाडल्याच्या फेक न्यूज पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहे. पाकिस्तानचे खोटे भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री यांनीही फेटाळून लावल्या आहेत.