महिलांना बनवलं जातंय सेक्स स्लेव; जेवण आवडलं नाही म्हणून जिवंत जाळलं; माजी न्यायाधीशाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 16:05 IST2021-08-21T16:03:00+5:302021-08-21T16:05:11+5:30
Afghanistan Taliban Women : अफगाणिस्तानच्या माजी महिला न्यायधीशानं सांगितलं तालिबानींच्या वागणूकीची खरी कहाणी. अफगाणिस्तानातील महिलांशी संपर्कात असल्याचा त्यांचा दावा.

महिलांना बनवलं जातंय सेक्स स्लेव; जेवण आवडलं नाही म्हणून जिवंत जाळलं; माजी न्यायाधीशाचा दावा
अफगाणिस्तानाततालिबाननं कब्जा केल्यानंतर त्यांच्याकडून सुरू असलेल्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येताना दिसत आहे. महिलांना सोबत घेऊन चालणार असल्याचा दावा जरी तालिबाननं केला असला तरी त्यामागील चेहरा अनेक घटनांमधून उघडा पडताना दिसत आहे. अफगाणिस्तानच्या माजी न्यायाधीश नजला अयूबी यांनी एका मुलाखतीदरम्यान धक्कादायक घटनांचं कथन केलं आहे. "तालिबानद्वारे महिलांचा छळ करून त्यांना मारलं जात आहे. लोकांच्या अधिकारांचा सन्मान करू आणि इस्लामनुसार शिक्षण घेण्याचा अधिकार देऊ अशी खोटी आश्वासनं ते देत आहेत," असं त्या म्हणाल्या.
महिलांविरोधात तालिबानींनी केलेल्या हिंसाचाराचे आणि गैरवर्तनाचे अनेक प्रकार आपल्या कानी आल्याचे आयूबी यांनी सांगितलं. नजला अयूबी यांनी स्काय न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या ठिकाणची भयाण परिस्थिती कथन केली. "एका महिलेनं बनवलेलं जेवण तालिबांनींना आवडलं नाही म्हणून त्यांनी त्या महिलेला जिवंत जाळलं," असंही त्या म्हणाल्या. "लोकांना त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यास जबरस्ती केली जात आहे. याशिवाय गेल्या काही आठवड्यांपासून अनेक तरूणींना शेजारी देशात पाठवलं जात आहे, जेणेकरून त्यांना सेक्स स्लेव बनवलं जावं," असंही अयूब म्हणाल्या.
अफगाणिस्तानातून आपला जीव वाचवून अयूब यांनी अमेरिकेत शरण घेतलं आहे. "ते कुटुंबातील लहान मुलींचं लग्न तालिबानींसोबत लावण्यासाठी जबरदस्ती करत आहे. त्यांनी महिलांना काम करण्याची परवानगी दिली आहे हे आश्वासन कुठे गेलं हे ठाऊक नाही. महिलांच्या अधिकारांबद्दल बोलण्यासाठी तालिबांनींपासून वाचण्याची गरज आहे. तालिबान एक वाईट स्वप्नाप्रमाणे आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
२० वर्षानंतर पुन्हा ताबा
अफगाणिस्तानवर २० वर्षांनंतर तालिबाननं पुन्हा कब्जा मिळवला आहे. तालिबाननं राष्ट्रध्यक्ष भवनावरही ताबा मिळवला आहे. टोलो न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार त्या ठिकाणी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंतरिम सरकारच्या प्रमुखाच्या रुपात अली अहमद जलाली याच्या नावाची चर्चा आगहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीदेखील देश सोडला आहे.