शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

आठवड्याचे 50 लाख! लसींचे बादशाह अदार पुनावाला लंडनमध्ये भाड्याने राहणार, अलिशान बंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 2:19 PM

Adar Poonawalla gave boost to London's Real Estate: पुनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश Dominika Kulczyk यांच्याकडून हा अलिशान बंगला भाडेतत्वावर घेतला आहे. जवळपास 25 हजार वर्गफुट एवढा अवाढव्य हा बंगला आहे. या आकारात इंग्रजांचे सरासरी 24 घरे बसतात. 

कोरोनाच्या कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे (serum institute) सीईओ अदार पुनावाला (Adar poonawala) यांनी लंडनमध्ये एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. या बंगल्याचे भाडेच एवढे आहे की तेथील मंदीत चाललेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बुस्ट मिळला आहे. एका आठवड्यासाठी पुनावाला त्या बंगल्याचे 50 लाख रुपये भाडे देणार आहेत. (The head of the world’s largest vaccine manufacturer Adar poonawala agreed to rent a property in Mayfair for about 50,000 pounds a week, a record for the exclusive London neighborhood.)

हा बंगला लंडनच्या पॉश असलेल्या मफेय़र भागात आहे. हा लंडनच नाही तर जगातील सर्वात महागड्या भागापैकी एक आहे. ब्लूमबर्गने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पुनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश Dominika Kulczyk यांच्याकडून हा अलिशान बंगला भाडेतत्वावर घेतला आहे. जवळपास 25 हजार वर्गफुट एवढा अवाढव्य हा बंगला आहे. या आकारात इंग्रजांचे सरासरी 24 घरे बसतात. 

या प्रॉपर्टीमध्ये एक गेस्ट हाऊस आणि एक सीक्रेट गार्डनदेखील आहे. या डीलमुळे लंडनच्या लक्झरी मार्केटला मोठा बूस्ट मिळणार आहे. ब्रेक्झिट आणि कोरोना महामारीमुळे तेथील रिअल इस्टेट व्यवसाय प्रभावित झाला होता. गेल्या पाच वर्षांत मफेयर भागातील भाडे जवळपास 9.2 टक्क्यांनी घसरले होते.

 ब्रिटनमध्ये गरज का?अदार पुनावाला यांना लंडनमध्ये घर भाड्याने घेण्याची गरज का पडली, असा सवाल उपस्थित होत आहे. पुनावाला यांच्या कंपनीने AstraZeneca सोबत करार करून कोरोनाचे करोडो डोस बनविले आहेत. यामुळे त्यांचे ब्रिटनला वारंवार येणेजाणे होत आहे. तसेच त्यांनी लंडनच्याच वेस्टमिनिस्टर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. या आधी त्यांनी मफेयरमधीलच ग्रॉसवेनोर हॉटेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते असफल झाले होते. पुनावाला यांचे कुटुंबीय हे जगातील अब्जाधीशांच्या रांगेत बसते. Bloomberg Billionaires Index नुसार त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ही 1,08,993 कोटी रुपये एवढी आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPuneपुणेLondonलंडन