बीजिंग : चीनमध्ये ट्रक - बस अपघातातील मृतांची संख्या वाढून ४३ झाली आहे. दक्षिणेकडील हुनान प्रांतात ज्वलनशील द्रव पदार्थ घेऊन जाणारा एक ट्रक बसला धडकून शनिवारी हा अपघात झाला होता. या ट्रकमध्ये दारू होती, असे वृत्त चिनी माध्यमांनी दिले आहे. अपघातामुळे महामार्गावर अनेक तास वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघातात एकूण पाच वाहनांचे नुकसान झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सहा जण जखमीही झाले आहेत.(वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}