तब्बल ₹1530000000000000 चा खजिना अमेरिकेच्या घशात! व्हेनेझुएलावर ताबा मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी कसं बदललं चित्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:30 IST2026-01-04T14:29:59+5:302026-01-04T14:30:38+5:30
खरे तर, तेल हे व्हेनेझुएलासाठी नेहमीच त्याची शक्ती आणि कमकुवतपणाही राहिले आहे. आता अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील थेट नियंत्रणाचा जागतिक शक्ती संतुलनावरही मोठा परिणाम होईल.

तब्बल ₹1530000000000000 चा खजिना अमेरिकेच्या घशात! व्हेनेझुएलावर ताबा मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी कसं बदललं चित्र?
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या लष्करी कारवाईमुळे जगाचे भू-राजकीय आणि आर्थिक चित्र पूर्णपणे बदलले आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे. हा साठा अंदाजे तब्बल ३०३ अब्ज बॅरल एवढा आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर, आता या प्रचंड संपत्तीवर अमेरिकेचे नियंत्रण येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तब्बल १७ ट्रिलियन डॉलर्सचा खजिना अमेरिकेच्या घशात -
बिजनेस टुडेच्या वृत्तानुसार, "५७ डॉलर प्रति बॅरलनुसार, सध्या व्हेनेझुएलाच्या तेल साठ्याचे मूल्य अंदाजे १७.३ ट्रिलियन डॉलर्स (१५३० लाख कोटी रुपये) एवढे आहे. ही रक्कम अमेरिका आणि चीन वगळता जगातील कोणत्याही देशाच्या जीडीपीच्या तुलनेत अधिक आहे. दरम्यान, आता अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल बाजारात मोठी गुंतवणूक करेल आणि हे तेल चीनसह जगातील इतर देशांना निर्यात करेल, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. कारण आता या खजिन्यावर अमेरिकेचा अघोषित कब्जा होईल.
आम्ही तेलाच्या व्यवसायात आहोत आणि ते जगाला विकू -
शनिवारी पत्रकारपरिषदेत बोलतान ट्रम्प म्हणाले, "अमेरिकन कंपन्या व्हेनेझुएलातील कोलमडलेल्या तेल पायाभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील. आम्ही तेलाच्या व्यवसायात आहोत आणि ते जगाला विकू." या निर्णयामुळे 'ओपेक' (OPEC) देशांचे वर्चस्व धोक्यात येऊ शकते आणि सौदी अरेबिया व रशियासारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांच्या धोरणांना मोठा फटका बसू शकतो.
खरे तर, तेल हे व्हेनेझुएलासाठी नेहमीच त्याची शक्ती आणि कमकुवतपणाही राहिले आहे. आता अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील थेट नियंत्रणाचा जागतिक शक्ती संतुलनावरही मोठा परिणाम होईल.