स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 08:29 IST2025-05-13T08:29:31+5:302025-05-13T08:29:50+5:30

ऑस्ट्रियन सैन्य इतिहासकार टॉम कूपर यांनी, भारताच्या लष्करी कारवाईचे वर्णन करताना हा 'पाकिस्तानविरुद्ध भारताचा स्पष्ट विजय, असल्याचे म्हटले आहे...

a clear victory of india against pakistan military historian big claim on Operation Sindoor says India's two missiles were not defeated | स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा

स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा

गेल्या आठवड्यात भारतानेपाकिस्तानात घुसून त्यांचे कंबरडे मोडले. भारतीय क्षेपणास्त्रांचा अचूक मारा पाहून संपूर्ण जग दिपून गेले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. त्यांपैकी सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे, चकलाला (नूर खान) हवाई तळ. हे पाकिस्तानी लष्कराचे सर्वात महत्त्वाचे हवाई तळ आहे. जे रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाजवळ आहे. भारताच्या या हल्ल्यानंतर, संपूर्ण जग भारताच्या क्षमतेचे कौतुक करत आहे.

भारताचा स्पष्ट विजय -
ऑस्ट्रियन सैन्य इतिहासकार टॉम कूपर यांनी, भारताच्या लष्करी कारवाईचे वर्णन करताना हा 'पाकिस्तानविरुद्ध भारताचा स्पष्ट विजय, असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले भारताची ही कारवाई पाकिस्तानसाठी मोठा धक्का होती. भारताने त्यांच्या हवाई तळांना आणि अणवस्त्र ठिकाणांना निशाणा बनवले. मात्र, पाकिस्तानकडे याला उत्तर नव्हते.

पाकिस्तानकडे भारतीय हल्ल्यांचे उत्तर नव्हते - 
भारत-पाकिस्तान संघर्षाचे विश्लेषण करताना एका ब्लॉग पोस्टमध्ये कूपर यांनी पीआर शब्द वापरत पाश्चात्य माध्यमांवर टीका केली. ते म्हणाले, "जेव्ह एखाद्या देशाकडून दुसऱ्या देशाच्या अण्वस्त्र सुविधांवर बॉम्बिंग केली जाते आणि दुसऱ्याकडे याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता नसते, तेव्हा माझ्या पुस्तकात हा स्पष्ट विजय आहे."

भारताच्या क्षेपणास्त्रापुढे पाकिस्तानने नांगी टाकली -
कूपर म्हणाले, पाकिस्तानकडे भारताच्या मारक क्षमतेचा सामना करण्यासाठी, सक्षम अशा लांब पल्ल्याच्या मिसाईलचा आभाव आहे. तसेच, भारताच्या "ब्रह्मोस" आणि "स्कॅल्प-ईजी" क्षेपणास्त्रांना तोड नाही, असे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकाने युद्ध विरामासाठी आपल्या भारतीय समकक्षासोबत संपर्क साधला, हे एक असे पाऊल आहे, जे युद्धाचा प्रभावीतेतील असंतुलन दर्शवते. तत्पूर्वी, शनिवारी दोन्ही बाजूंनी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.

Web Title: a clear victory of india against pakistan military historian big claim on Operation Sindoor says India's two missiles were not defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.