कुत्र्याचे पिल्लू न दिल्यामुळे ८ वर्षाच्या चिमुरडीची हत्या

By Admin | Updated: October 6, 2015 19:23 IST2015-10-06T18:44:43+5:302015-10-06T19:23:11+5:30

कुत्र्याचे पिल्लू न दिल्यामुळे अमेरेकेत टेनसी येथे एका ११ वर्षाच्या मुलाने ८ वर्षाच्या मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली

8-year-old Chimudiri murdered for not giving puppies | कुत्र्याचे पिल्लू न दिल्यामुळे ८ वर्षाच्या चिमुरडीची हत्या

कुत्र्याचे पिल्लू न दिल्यामुळे ८ वर्षाच्या चिमुरडीची हत्या

 ऑनलाइन लोकमत

चिकागो, दि. ६ - कुत्र्याचे पिल्लू न दिल्यामुळे अमेरीकेत टेनीसी येथे एका ११ वर्षाच्या मुलाने ८ वर्षाच्या मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक  घटना घडली.  मॅकलेया ही मुलगी कुत्र्याच्या पिल्ल्यासोबत घराच्या जवळील बागेत खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाने मॅकलेयाकडे कुत्र्याचे पिल्लू मागितले असता तिने ते दिले नाही म्हणून चिडलेल्या मुलाने मॅकलेयाच्या छातीत गोळ्या घातल्या असे तिच्या आईने सांगितले. 
 
पुढे ती म्हणाली, तो मुलगा आमच्या सोसायटीमध्ये राहण्यासाठी आल्या पासून त्याचा आम्हाला त्रास होत होता. मॅकलेया  जवळच असणाऱ्या व्हाईट पाईन ह्या शाळेत शिकत होती, ती सतत माझ्यासोबत हसत-खेळत राहत होती, तिच्या जाण्याचे दुख झाले आहे. 
 

 

Web Title: 8-year-old Chimudiri murdered for not giving puppies