Israel-Iran Conflict: मध्यपूर्वेतील संघर्ष गंभीर वळणावर, इस्रायलविरोधात ८ मुस्लिम देश एकवटले! नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 00:17 IST2026-03-17T00:16:24+5:302026-03-17T00:17:09+5:30

Israel-Iran Conflict News: मध्यपूर्वेतील संघर्ष गंभीर वळणावर पोहोचले असून इस्रायलच्या एका निर्णायावरून मुस्लीम देशांत संतापाची लाट उसळली आहे.

8 Muslim Nations Unite Against 16-Day Closure of Al-Aqsa Mosque During Ramadan. | Israel-Iran Conflict: मध्यपूर्वेतील संघर्ष गंभीर वळणावर, इस्रायलविरोधात ८ मुस्लिम देश एकवटले! नेमकं कारण काय?

Israel-Iran Conflict: मध्यपूर्वेतील संघर्ष गंभीर वळणावर, इस्रायलविरोधात ८ मुस्लिम देश एकवटले! नेमकं कारण काय?

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलने मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात अल-अक्सा मशिद गेल्या १६ दिवसांपासून बंद आहे. इस्रायलच्या या निर्णायावरून मुस्लीम देशांत संतापाची लाट उसळली असून अरब राष्ट्रांच्या समूहाने नाराजी व्यक्त केली आहे. अल-अक्सा मशिदीच्या आवारात मुस्लिमांना नमाज अदा करण्यापासून रोखण्याचा इस्रायलला कोणताही अधिकार नाही, असे अरब लीगने ठामपणे सांगितले. 

अरब राष्ट्रांच्या समूहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलचे हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे. यामुळे जागतिक शांतता धोक्यात येऊ शकते, असे अरब राष्ट्रांच्या समूहाने ठामपणे म्हटले आहे. जेरुसलेममधील पवित्र स्थळांबाबत इस्रायलच्या बेकायदेशीर कारवाया थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव आणावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. इराणविरुद्धअमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष उफाळून आल्यापासून अल-अक्सा मशिद बंदच ठेवली आहे.  दरम्यान, वेस्ट बँक प्रदेशात, सध्या केवळ ५० लोकांना इब्राहिमी मशिदीमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी दिली जात आहे.

१९६७ मध्ये इस्रायलने पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवल्यापासून, रमजानच्या महिन्यात इतक्या दिवस अल-अक्सा मशिद बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्बंध लादले आहेत, अशी भूमिका इस्रायलने घेतली आहे.  इराणकडून अल-अक्सा मशि‍दीवर हल्ला केला जाण्याची भिती इस्रायलने व्यक्त केली. 

या निर्बंधांमुळे अल-अक्सा मशिदीचा संपूर्ण परिसर निर्मनुष्य झाला असून, मुस्लिम समुदायाला रस्त्यांवर आणि ओल्ड सिटी परिसरातील भिंतींच्या कडेला उभे राहून नमाज अदा करावी लागत आहे. रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये लैलत अल कद्र या अत्यंत पवित्र रात्रीचा समावेश असतो.  मशिद बंद ठेवल्यामुळे मुस्लीम समुदायाला नमाज अदा करण्याच्या पद्धतीत व्यत्यय येत आहे, असे मुस्लिम संघटना आणि इस्लामी राष्ट्रांकडून स्पष्ट करण्यात आले. कतार, जॉर्डन, इंडोनेशिया, तुर्की, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती यांसह आठ अरब-इस्लामिक राष्ट्रांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

Web Title : इज़राइल-ईरान संघर्ष: अल-अक्सा बंद होने पर मुस्लिम राष्ट्र एकजुट

Web Summary : इज़राइल-ईरान तनाव के बीच, रमजान के दौरान अल-अक्सा मस्जिद का बंद होना आक्रोश भड़काता है। आठ मुस्लिम राष्ट्र प्रतिबंधों की निंदा करते हैं, इसे अंतर्राष्ट्रीय कानून का उल्लंघन बताते हैं। इज़राइल को ईरानी हमलों का डर है; प्रतिबंधों के कारण मुसलमान मस्जिद के बाहर प्रार्थना करते हैं।

Web Title : Israel-Iran Conflict: Muslim Nations Unite Over Al-Aqsa Closure

Web Summary : Amid Israel-Iran tensions, Al-Aqsa mosque's closure during Ramadan sparks outrage. Eight Muslim nations condemn the restrictions, citing violation of international law. Israel fears Iranian attacks; Muslims pray outside mosque due to restrictions.