अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 07:13 IST2018-11-18T07:11:03+5:302018-11-18T07:13:00+5:30

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एका अल्पवयीन मुलाने भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. 

61 years old man from telangana was shot dead by teen in america | अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

ठळक मुद्देअमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या झाडून हत्याभारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे चिंतेचे वातावरण

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एका अल्पवयीन मुलाने भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, 61 वर्षीय भारतीय नागरिक सुनील एडला यांची वेंट्नोर शहरात 16 वर्षीय मुलाने गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. सुनील एडला या महिन्यात आपल्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात येणार होते. सुनील एडला मूळचे भारतातील तेलंगणामधील रहिवासी होते. मात्र, गेली 30 वर्षे अमेरिकेतील अटलांटिक काऊंटीमध्ये ते राहत होते. तसेच, येथील अटलांटिक सिटीमध्ये सर्व्हिसला होते. संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याचे अटलांटिक काऊंटीचे प्रोसीक्यूटर डी जी टायनर यांनी सांगितले आहे.  



 

दरम्यान, अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांवर हल्ले होत असून या घटनेमुळे चिंतेचे वातावरण आहे. तेलंगणातील 32 वर्षीय अभियंता श्रीनिवास कुचिभोटला यांची 23 फेब्रुवारीला गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. तर 10 फेब्रुवारीला तेलंगणातीलच वामिशी रेड्डी यांची हत्या करण्यात आली होती.
 

Web Title: 61 years old man from telangana was shot dead by teen in america