सौदी अरेबियात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. हे सर्व भारतीय उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते. रात्री १.३० वाजता बसमधून प्रवास करत ते मक्काहून मदीनाला चालले होते. त्यावेळी अचानक ही बस डिझेल टँकरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे मोठी आग भडकली. त्यात ४० हून अधिक भारतीय मृत्युमुखी पडले.
माहितीनुसार, मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते. अपघातावेळी बसमध्ये कमीत कमी २० महिला आणि ११ मुले प्रवास करत होती. मक्का येथे आपली धार्मिक यात्रा करत ते मदीनाला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या अपघातस्थळी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.
या घटनेबाबत खासदार असदुद्दीन औवेसी यांनी सांगितले की, मलाही आत्ताच या अपघाताची माहिती मिळाली. हैदराबाद येथील २ ट्रॅव्हल एजन्सी लोकांना घेऊन मक्का मदिना येथे गेले होते. तिथे अपघातात बसला भीषण आग लागली. त्यात १ वगळता इतर कुणीही वाचले नाही असं कळतंय. मी तिथल्या राजदूत कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तेदेखील अपघाताची माहिती घेत आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनी तात्काळ या घटनेची दखल घ्यावी. या घटनेतील प्रवाशांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जावेत. जखमींना योग्य ते उपचार मिळावेत अशी माझी भारत सरकारकडे मागणी आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, या अपघातात ४ जण वाचल्याचे कळत आहे. या जखमींवर मदीनाच्या अल हमना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे. रात्री १.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली, ज्यावेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते. या अपघातात बस संपूर्णपणे जळून खाक झाली. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण जाणार आहे.
Web Summary : A devastating bus accident in Saudi Arabia killed 42 Indian pilgrims traveling from Mecca to Medina. The bus collided with a diesel tanker, causing a massive fire. Many women and children from Telangana and Hyderabad are among the deceased. Four survivors are receiving treatment.
Web Summary : सऊदी अरब में मक्का से मदीना जा रही एक बस डीजल टैंकर से टकरा गई, जिससे भीषण आग लग गई। इस दुर्घटना में 42 भारतीय तीर्थयात्रियों की मौत हो गई। मृतकों में तेलंगाना और हैदराबाद की कई महिलाएं और बच्चे शामिल हैं। चार बचे लोगों का इलाज चल रहा है।