कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग, 23 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 09:56 IST2018-11-11T09:48:19+5:302018-11-11T09:56:41+5:30

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जंगलाला शनिवारी (10 नोव्हेंबर) भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

23 people dead in dangerous fire in the forests of northern california | कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग, 23 जणांचा मृत्यू

कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग, 23 जणांचा मृत्यू

ठळक मुद्देअमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जंगलाला शनिवारी (10 नोव्हेंबर) भीषण आग लागली आहे.आगीत आतापर्यंत जवळपास 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मलीबू रिसॉर्टपर्यंत ही आग पसरली असून येथे ब्रॅड पिट, हॅले बेरी, जेनिफर ऑनिस्टन, लिओनार्डो डिकेप्रियो, जॅक निकलसन या कलाकारांची घरेही आहेत.

कॅलिफोर्निया - अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जंगलाला शनिवारी (10 नोव्हेंबर) भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत जवळपास 23 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात लागलेल्या आगीमध्ये परिसरातील शेकडो घरे, रेस्टॉरंटस् आणि वाहने जळून खाक झाली आहेत. 

अग्निशमन दलाचे अनेक जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जवळपास 70 एकरचे जंगल आगीत भस्मसात झाले आहे.  जोरदार वारे वाहत असल्याने ही आग पसरत आहे. मलीबू रिसॉर्टपर्यंत ही आग पसरली आहे. मलीबू येथे ब्रॅड पिट, हॅले बेरी, जेनिफर ऑनिस्टन, लिओनार्डो डिकेप्रियो, जॅक निकलसन या प्रसिद्ध कलाकारांची  घरेही आहेत. त्यामुळे या भीषण आगीनंतर त्यांना तातडीने ही घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title: 23 people dead in dangerous fire in the forests of northern california

टॅग्स :fireHomeआगघर